धक्कादायक, राज्यातील शाळांमध्ये 5 लाख विद्यार्थी बोगस, संस्थाचालकांनी कशा पद्धतीने चालवली कोट्यवधींची लूट

राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये 5 लाख विद्यार्थी बोगस आढळून आली आहेत. आधार कार्ड नसलेले 5 लाखांवर विद्यार्थी दाखवून शाळांनी पदे मंजूर करुन घेतली. युडायस प्रणालीत दाखवलेली पटसंख्या त्या तुलेनेत नोंदविलेली आधार संख्या यावरून राज्य शिक्षण विभागाने आक्षेप नोंदवला आहे

धक्कादायक, राज्यातील शाळांमध्ये 5 लाख विद्यार्थी बोगस, संस्थाचालकांनी कशा पद्धतीने चालवली कोट्यवधींची लूट
school (file photo)
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 8:45 AM

राज्यातील शिक्षण क्षेत्रात धक्कादायक बाब उजेडत आली आहे. खासगी संस्थाचालकांनी बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची लूट चालवली आहे. राज्यात तब्बल पाच लाख विद्यार्थी बोगस आढळले आहेत. शाळांची पटसंख्या पूर्ण करण्यासाठी वर्ग कमी होऊ नये यासाठी बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले जात आहेत. राज्यात दरमहा बोगस विद्यार्थ्यांवर पाचशे कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगितले जात आहे. ही बोगस विद्यार्थी संख्या आधार कार्डमुळे समोर आली आहे. राज्यात एकूण 5 लाख 16 हजार 188 विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश आधार कार्ड नसताना झाला आहे. हे विद्यार्थी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश करताना आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करणे बंधनकारक केले आहे.

काय सुरु आहे प्रकार

राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये 5 लाख विद्यार्थी बोगस आढळून आली आहेत. आधार कार्ड नसलेले 5 लाखांवर विद्यार्थी दाखवून शाळांनी पदे मंजूर करुन घेतली. युडायस प्रणालीत दाखवलेली पटसंख्या त्या तुलेनेत नोंदविलेली आधार संख्या यावरून राज्य शिक्षण विभागाने आक्षेप नोंदवला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये 55 लाख 26 हजार 874 विद्यार्थी आहेत. परंतु त्यापैकी आधार नसलेले 1 लाख 79 हजार 56 विद्यार्थी आहेत. म्हणजेच हे विद्यार्थी बोगस आहेत. खासगी अनुदानित शाळांमध्ये एकूण 97 लाख 69 हजार 202 विद्यार्थी आहेत. त्यापैकी आधार क्रमांक नसलेले 1 लाख 11 हजार 444 विद्यार्थी आहेत. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 62 लाख 61 हजार 778 विद्यार्थी आहेत. त्यातील 2 लाख 25 हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. म्हणजे एकूण 5 लाख 16 हजार 188 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही.

आधार नसताना वाढीव पट दाखविला

राज्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसताना वाढीव पट दाखवला आहे. राज्यातील खासगी शाळांवर शिक्षण खात्याचा थेट आक्षेप आहे. यामुळे राज्य शासनाचे कोट्यवधी रुपये दर महिन्याला जात आहेत. राज्यात सर्वात आधी २०२१ मध्ये बीड जिल्ह्यात बोगस पटसंख्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ‘जनहित याचिका’ दाखल झाली होती. त्यानंतर न्यायालयाने चौकशीसाठी न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास (निवृत्त) यांची समिती नेमली होती. या समितीने जुलै २०२२ मध्ये अहवाल शासनाला दिला. तो अहवाल शासनाने स्वीकारला आणि मार्गदर्शक सूचना आता काढल्या होत्या. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना आधारची सक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार ?

मे महिन्याचा दुसरा आठवडा झाला त्यानंतर राज्यात आरटीई प्रवेश सुरु झाले नाही. यामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार ? असा प्रश्न पालकांनी राज्य शासनाला विचारला आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल केल्याने पालकांनी घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवीन बदलास स्थगिती दिली होती. ९ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्यानंतर नवीन पत्र राज्य शासनाने काढणे आवश्यक होते. मात्र अजुनही हालचाल होत नसल्याने पालक नाराज आहे. आरटीई अंतर्गत खाजगी शाळात २५ टक्के जागा राखीव ठेवाव्या लागतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.