देशांत शस्त्रनिर्मितीची स्पर्धा वाढली, विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची गरज : भगतसिंह कोश्यारी
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ते नागपूर विद्यापीठात रक्षा व अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
नागपूर : संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यापीठांमध्ये सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. ते नागपूर विद्यापीठात संरक्षण व अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. (for becoming self reliant in defence sector universities need to start security courses said Governor Bhagat Singh Koshyari)
आधुनिक तंत्रज्ञानाचीही देशांमध्ये स्पर्धा
यावेळी वेळी बोलताना कधीकाळी अध्यात्मिक कौशल्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई देशांमध्ये सुरक्षाविषयक शस्त्रनिर्मितीची स्पर्धा वाढली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचीही एकमेकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यापीठांनीही संरक्षण क्षेत्रातील सुरक्षाविषयक अभ्यासक्रमांची सुरुवात करणे गरजेचे आहे,” असे कोश्यारी म्हणाले.
संरक्षण व अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
तसेच नागपूर विद्यापीठाने या संदर्भात पाऊल उचलल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमात कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत नागपूर विद्यापीठामध्ये संरक्षण व अंतरिक्ष कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
तर मी उत्तराखंडमध्ये परत जातो
तर दुसरीकडे भगतसिंह कोश्यारी मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल 10 सप्टेंबर रोजी बदलले. यामध्ये उत्तराखंडचा कार्यभार सेवानिवृत्त ले. जनरल गुरमित सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं होतं. त्यांनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं होतं. कोश्यारी सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते.
भगतसिंह कोश्यारी नेमंक काय म्हणाले होते ?
“नेहमी अतिवृष्टी पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती नेहमी असायची. पण मी राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. अतिवृष्टी होत आहे. जर हे जंयत पाटील यांना वटत असेल तर मी लवकरात लवकर हे सोडून निघून जाईल. असंच तर नुकसान झालं नसेल ना जंयत साहेब ?” असे कोश्यारी म्हणाले होते.
इतर बातम्या :
संशयित दहशतवादी जान मोहम्मदकडून गिरगाव चौपाटीची रेकी, मुंबई लोकलचीही पाहणी : सूत्र
OBC Reservation : ‘हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण’, राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या निर्णयावर भाजपची टीका
डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्यावर महापालिका सक्रीय, विविध झोनमध्ये स्वच्छता व औषध फवारणीसाठी विशेष मोहिमhttps://t.co/SYOd4WmWje#Aurangabadhealth| #Aurangabadcity| @commissionerabd
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
(for becoming self reliant in defence sector universities need to start security courses said Governor Bhagat Singh Koshyari)