HSC Board Exam: पुढच्या वर्षापासून कदाचित बारावीच्या मार्कांचं ओझं कमी होऊ शकतं
पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
12 वी चा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा नवी दिल्ली : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 पासून दोनदा घेण्यात येणार आहे. वर्षातून दोनदा CUET आयोजित केली तर ही परीक्षा विद्यार्थ्यांना योग्य संधी (Opportunity) प्रदान करेल. बोर्डाच्या परीक्षेत जास्त गुण मिळविण्याचं ओझं विद्यार्थ्यांवर नसेल. या CUET परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यापीठात (Top Universities) प्रवेश मिळू शकतो. पुढच्या वर्षापासून या दोन्ही परीक्षा बारावीच्या परीक्षेनंतर 45 दिवसांच्या अंतराने घेतल्या जातील. जे विद्यार्थी पहिल्या संधीत चांगला स्कोअर करू शकले नाहीत ते दुसऱ्या ते दुसऱ्यांदा परीक्षा देऊन स्कोअर करू शकतात. सीयूईटी परीक्षा बारावीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
11,51,319 उमेदवारांनी नोंदणी केली
युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सांगितलं की, CUET UGC साठी 11,51,319 उमेदवारांनी नोंदणी केलीये आणि 9,13,540 उमेदवारांनी अर्ज शुल्क भरले आहेत. येत्या काही वर्षांत आणखी विद्यापीठं CUET चा स्वीकार करतील अशी अपेक्षा असल्याचंही ते म्हणालेत. पुढील शैक्षणिक सत्रापासून CUET परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित केली जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले.
पीजी प्रवेशासाठीही सीयूईटी
सीयूईटी नंतर पीजीसाठीही सीयूईटीची घोषणा करण्यात आलीये. सियूईटी पीजीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात यूजी सीयूईटी परीक्षाही होणार आहे. या परीक्षेची तारीख अजून जाहीर केलेली नाही. पण आता पीजीसाठी सीयूईटी जाहीर झाल्यानंतर दोन्ही परीक्षा एकाच वेळी घेतल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये. सीयूईटी पीजीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२२ आहे.
CUET PG साठी अर्ज प्रसिद्ध
CUET PG च्या घोषणेनंतर, आता केंद्रीय विद्यापीठात PG प्रवेशासाठी (CUET PG 2022) CUET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लवकरच परीक्षेचा नमुना आणि सर्व माहिती NTA वेबसाइट nta.ac.in वर अपडेट केली जाईल.
CUET PG परीक्षा पॅटर्न
CUET UG चा परीक्षा पॅटर्न आधीच प्रसिद्ध झाला आहे. परीक्षा पद्धतीनुसार, परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल. CUET PG साठी अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण हाच पॅटर्न पीजीसाठी वापरला जाईल, अशी अट आहे. मात्र यासाठी अधिकृत घोषणाहोणे आवश्यक आहे.