FYJC Admissions: अकरावी प्रवेश ! काय आहेत मॉक अर्ज, कसे भरणार ?
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याचा मॉक राउंड सोमवारपासून 23 मे 2022 सुरू झाला आहे आणि रविवार 29 मे 2022 पर्यंत तो सुरु राहणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात. त्यानंतर ते प्रवेश घेऊ इच्छित असलेले शहर निवडू शकतात. या मॉक राउंड प्रक्रियेत उमेदवारांसाठी डेमो-लॉगिन प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.
मुंबई: अकरावीच्या प्रवेशासाठी (11th Admissions) सध्या ऑनलाइन फॉर्म (Online Form) भरण्याचा सराव चालू आहे. हे मॉक अर्ज (Mock Application Round) 29 मे पर्यंत सुरु राहणार आहेत. सध्या 10वीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी FYJCमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण असेल. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याचा मॉक राउंड सोमवारपासून 23 मे 2022 सुरू झाला आहे आणि रविवार 29 मे 2022 पर्यंत तो सुरु राहणार आहे. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करू शकतात. त्यानंतर ते प्रवेश घेऊ इच्छित असलेले शहर निवडू शकतात. या मॉक राउंड प्रक्रियेत उमेदवारांसाठी डेमो-लॉगिन प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.
The Centralised Admission Process to #FYJC 2022-23 for the Mumbai Metropolitan Region & areas within municipal corporation limits in Pune, Pimpri Chinchward,Nagpur, Amravati,Nashik will commence from May 23 onwards.For more details, refer https://t.co/Sn9eIhSxfc#admissions pic.twitter.com/wU152DIGQs
हे सुद्धा वाचा— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 21, 2022
29 मे रोजी ही अर्ज भरण्याची प्रक्रिया संपेल आणि हा डेमो-लॉगिन डेटा नष्ट केला जाईल. त्यानंतर 30 मेपासून विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरू शकणार आहेत. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्रातील काही निवडक शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.
यावर्षी 11 वी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक उशिरा जाहीर केलं गेलं. यापूर्वी 17 मे रोजी मॉकराऊंड सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र तो स्थगित करण्यात आला होता आणि तो आता सोमरपासून (23 मे 2022) सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेतील पहिला फॉर्म 30 मे 22 पासून भरता येईल. तर 10वीच्या निकालानंतर फॉर्मचा दुसरा भाग भरता येईल.
प्रवेश प्रक्रिया अशी असणार
विद्यार्थ्यांना 27 मेपर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर सराव केलेली ही माहिती 28 मे रोजी नष्ट करता येईल. त्यानंतर 30 मे रोजी प्रत्यक्षात अर्ज भरता येणार आहे. प्रत्यक्षात अर्ज भरण्याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 30 मे रोजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. तसेच अर्जात टक्केवारी नमूद करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास http://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजसाठी प्रशिक्षण वर्गातून पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती द्वावी, असंही आवाहन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केलंय.