GATE Exam 2022 : गेट परीक्षेची नोंदणी लांबणीवर, ‘या’ तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरु

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आलीय.

GATE Exam 2022 : गेट परीक्षेची नोंदणी लांबणीवर, 'या' तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरु
गेट परीक्षा 2022
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 2:59 PM

GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. विद्यार्थी आता गेट परीक्षेची नोंदणी 2 सप्टेंबरपासून करु शकतात. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आता 2 सप्टेंबरपासून सुरू होईल. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून जारी करण्यात आलं आहे. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022 GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?

गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल.  विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क

एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये लेट फीसह: 1250 रुपये इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये विलंब फीसह 2000 रुपये

परीक्षा कधी होणार?

GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

गेट परीक्षा नेमकी काय?

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि सीएफटीआय संस्थांच्या एम.ई. / एम.टेक / पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेट ही परीक्षा घेण्यात येते. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयू) भरतीसाठीही गेट स्कोअरचा वापर केला जातो. 2021 च्या गेट परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआटी मुंबईकडं देण्यात आली होती.

इतर बातम्या:

FYJC Admission : अकरावीसाठी पहिल्या यादीतील प्रवेशनिश्चितीची अखेरची संधी, दुसऱ्या फेरीची आज घोषणा

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर

GATE 2022 online applications postpone to 2 September by IIT Kharagpur check details at gate.iitkgp.ac.in

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.