GATE फॉर्मसाठी आयआयटीची मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा दुरुस्ती

GATE 2025 Application Correction Date: तुम्ही गेट 2025 चा फॉर्म भरला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयआयटी रुरकीने GATE 2025 च्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 4 दिवसांनी वाढवली आहे. आता विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. मात्र, ही दुरुस्ती कशी करता येणार, याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

GATE फॉर्मसाठी आयआयटीची मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा दुरुस्ती
GATE 2025Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 4:43 PM

भावी इंजिनीअर्ससाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2025च्या फॉर्ममध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती करता येणार आहे. यापूर्वी फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची तारीख ही 6 नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, आता या तारखेत वाढ करण्यात आली असून ही मुदत 4 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.

‘या’ वेबसाईटवर करा दुरुस्ती

GATE 2025 यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ते गेट 2025 gate2025.iitr.ac.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी क्रमांकासह लॉगिन करू शकतात आणि फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात.

फॉर्ममध्ये काय दुरुस्त करता येणार?

GATE 2025 च्या फॉर्ममध्ये विद्यार्थी आपले नाव, जन्म तारीख, परीक्षेचे शहर, विषय आणि त्यांची श्रेणी सुधारू शकतात. अधिक माहितीसाठी आयआयटी रुरकीने जारी केलेली नोटीस पाहू शकता.

नोटीसमध्ये काय म्हटलंय?

IIT रुरकीने फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची तारीख वाढविण्यासंदर्भात एक नोटीस देखील जारी केली आहे. ही नोटीस विद्यार्थी तपासू शकतात. अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान उमेदवार अर्ज दुरुस्तीसाठी GOAPS (goaps.iitr.ac.in) मध्ये लॉग इन करू शकतात.

फी किती लागणार?

अर्जात सुधारणा करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क म्हणजेच फी भरावी लागणार आहे. जर उमेदवाराला एससी, एसटीमधून इतर कोणत्याही प्रवर्गात जायचे असेल तर त्यांना 1400 रुपये शुल्क भरावे लागेल.

GATE 2025 फॉर्म कसा दुरुस्त करावा

आधी तुम्ही GATE 2025च्या gate2025.iitr.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

होम पेजवर दिलेल्या GATE 2025 टॅबवर क्लिक करा

रजिस्ट्रेशन नंबर वगैरे डिटेल्स टाकून लॉगिन करा

फॉर्ममध्ये दुरुस्ती करून शुल्क जमा करा

GATE 2025 परीक्षा कधी होणार?

GATE 2025 ची परीक्षा 1, 2, 15 आणि 16 फेब्रुवारी 2025 रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे.

GATE 2025 परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार?

GATE 2025 ही परीक्षा CBT पद्धतीने 3 तास चालणार आहे. GATE 2025 चे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट 2 जानेवारी 2025 रोजी जारी केले जाईल. 19 मार्च 2025 रोजी निकाल जाहीर होणार आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार आहे. आम्ही तुम्हाला GATE 2025 या परीक्षेची सर्व माहिती दिली आहे. आता तुम्ही वेळेपूर्वीच तुमच्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात. कारण, ऐनवेळी गोंधळ उडायला नको.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.