GATE 2021 परीक्षेची उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा सुरु
GATE 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. GATE 2021 answer key challenge
नवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यामध्ये 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला GATE 2021 परीक्षा पार पडली. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून ही परीक्षा घेण्यात आली. GATE 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन आक्षेप नोंदवता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षा दिली असेल ते www.gate.iitb.ac.in या वेबसाईटवर आक्षेप नोंदवता येतील. (GATE 2021 IIT Bombay opens answer key challenge window check details)
GATE म्हणजेच ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरींग 2021 परीक्षा अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्याशाखांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन उत्तरतालिकेविषयी आक्षेप नोंदवता येतील.
GATE 2021 उत्तर तालिकेला आव्हान कसं देणार
1.GATE 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेला आव्हान देण्यासाठी gate.iitb.ac.in या वेबसाईटला भेट द्या 2. होमपेजवरील Contest Answer Key या लिंकवर क्लिक करा 3. यानंतर पुढील टॅब वर नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल 4. ज्या प्रश्नाच्या उत्तराला चॅलेंज करायचे त्याची माहिती भरा 5. उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवण्यासाठी 500 रुपयांची फी भरा 6. तुम्हाला उत्तराला आक्षेपासंबंधी कागदपत्रं अपलोड करावे लागतील.
GATE 2021 परीक्षेचा निकाल मार्चमध्ये
GATE परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 ला जाहीर होणार आहे. GATE परीक्षेच्या अधिक माहितीसाठी सातत्यानं IIT GATE च्या वेबसाईटला भेट द्या. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहती, खरगपूर, कानपूर, मद्रास, रुरकी यांच्याकडून दरवर्षी रोटेशन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्यात येते. GATE 2021 ची परीक्षा आयआयटी मुंबईकडून घेतली गेली आहे. यंदाची गेट परिक्षा 27 विषयांमध्ये घेतली गेली.
GATE 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोडhttps://t.co/SBOC2epAC2#Gate2021 | #GATE2021| #iitbombay | #iitb
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
संबंधित बातम्या GATE 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड
IIM कडून CAT Answer Key 2020 जारी; अशी तपासा आपली उत्तरे
(GATE 2021 IIT Bombay opens answer key challenge window check details)