Maharashtra Board Result 2022 : विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा ! महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, ‘पेपर तपासणी पूर्ण झालीये…’

'पेपर तपासणी पूर्ण झाली आहे', असे महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. यानंतर मार्क्स मॉडेरेट केले जातात. प्रत्येक उत्तरपत्रिकेला स्कॅन केलं जातं. बारकोड्स सुद्धा स्कॅन करून चेक केले जातात. प्रत्येक विभाग आपापला स्वतंत्र अहवाल तयार करतो.

Maharashtra Board Result 2022 : विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा ! महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, 'पेपर तपासणी पूर्ण झालीये...'
Maharashtra Board Result 2022 : विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा ! Image Credit source: Official Website
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 5:08 PM

महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) दहावी आणि बारावीच्या जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांना निकालासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र बोर्डाच्या एचएससी (HSC)आणि एसएससी (SSC) परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. पण निकाल जाहीर होण्यास (महाराष्ट्र बोर्डाचा निकाल) वेळ लागेल. महाराष्ट्र दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (एमएसबीएसएचएसई) अध्यक्ष शरद गोसावी यांनी खुलासा केलाय. एमएसबीएसएचएसई एसएससी आणि एचएससीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.

‘पेपर तपासणी पूर्ण झाली आहे’, असे महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. यानंतर मार्क्स मॉडेरेट केले जातात. प्रत्येक उत्तरपत्रिकेला स्कॅन केलं जातं. बारकोड्स सुद्धा स्कॅन करून चेक केले जातात. प्रत्येक विभाग आपापला स्वतंत्र अहवाल तयार करतो. या अहवालात नमूद केलेल्या चुका आणि त्यात सुधारणा करण्यासाठी लागणारा कालावधी या आधारे आम्ही शिक्षण विभागाकडे निकालासंदर्भात प्रस्ताव पाठवतो. यानंतर महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग (महा शालेय शिक्षण विभाग) बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर करतो.”

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार ?

कॉपी तपासणी आणि पुढील प्रक्रियेबद्दल माहिती देताना महाराष्ट्र बोर्डाच्या अध्यक्षांनी एमएसबीएसएचएसई इयत्ता 10 12 वी चा निकाल 2022 कधीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो याबद्दलही माहिती दिली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (एसएससी निकाल 2022) 15 ते 20 जून 2022 दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र बोर्ड 12 वी (महाराष्ट्र इयत्ता 12 वी चा निकाल 2022) 5 ते 10 जून 2022 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. या तारखा संभाव्य तारखा आहेत. काही अडचण आल्यास या तारखांमध्ये परिस्थितीनुसार बदलही होऊ शकतो. सध्या उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि विभागावर अहवाल पूर्ण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

एमएसबीएसएचएसई निकाल : या संकेतस्थळावर जाहीर होणार निकाल

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2022 मध्ये सुमारे 30 लाख विद्यार्थी बसले होते. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख 25 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षा 15 मार्च 2022 रोजी सुरु झाल्या. तर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 14 लाख 72 हजार होती. महाराष्ट्र एच एस सीची परीक्षा 04 मार्चपासून सुरु झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.