भारत सरकारची “मोफत लॅपटॉप वाटप” योजना! काय आहे हा मेसेज?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टेक्स्ट मेसेज व्हायरल होतोय, ज्यात भारत सरकारला 5 लाख मोफत लॅपटॉप वितरित करण्याच्या योजनेबद्दल सांगण्यात आलं असल्याचं म्हटलं जातंय.

भारत सरकारची मोफत लॅपटॉप वाटप योजना! काय आहे हा मेसेज?
Free laptop schemeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:31 PM

अनेक राज्य सरकारे विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना राबवतात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसह अनेक प्रकारच्या योजनाही केंद्र सरकारकडून चालवल्या जातात. आता भारत सरकार देशभरातील 5 लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना आणत असल्याची चर्चा होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय 5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत देणार असल्याचा संदेश सगळीकडे पसरविला जातोय. या मेसेजमध्ये फ्री लॅपटॉपची लिंकही देण्यात आली आहे. विद्यार्थी हा संदेश वाचून जाम खुश होतायत. या मेसेजबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पीआयबीने याचं उत्तर दिलेलं आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टेक्स्ट मेसेज व्हायरल होतोय, ज्यात भारत सरकारला 5 लाख मोफत लॅपटॉप वितरित करण्याच्या योजनेबद्दल सांगण्यात आलं असल्याचं म्हटलं जातंय.

त्या सोशल मीडिया व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की- ‘केंद्रीय शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप करत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मुलांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आपण या विनामूल्य लॅपटॉपसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.”

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) @PIBFactCheck आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडलवर या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितलीये.

सोशल मीडियावर जो मेसेज पसरवला जात आहे, तो फेक असल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाहीये.

अशा मेसेजसह येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका. अशी चूक करून तुम्ही ऑनलाइन फ्रॉडचे शिकारही होऊ शकता.

भारत सरकारच्या कोणत्याही योजनेसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या. याशिवाय पीआयबीला 8799711259 मेसेज पाठवून किंवा socialmedia@pib.gov.in ईमेल करून व्हायरल मेसेजची सत्यताही तुम्ही जाणून घेऊ शकता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.