GPAT 2022 Result: आला ना GPAT 2022 निकाल आला ना ! असा चेक करा निकाल…
GPAT 2022 च्या स्कोअरच्या आधारे, उमेदवारांना देशभरातील विविध संस्थांमध्ये पीजी लेव्हल फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार किमान गुणांच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजशी संपर्क साधावा लागेल. GPAT पूर्वी एआयसीटीई 2018 सालापर्यंत आयोजित करण्यात येत होती.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीट्यूड टेस्ट (Graduate Pharmacy Aptitude Test) अर्थात GPAT 2022 चा निकाल (GPAT 2022 Result) जाहीर केला आहे. जीपीएटी परीक्षेला बसलेले उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल तपासू शकतात. जीपीएटी परीक्षा 9 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. जीपीएटी परीक्षा साठी उपस्थित असलेले उमेदवार आता एनटीए nta.ac.in अधिकृत वेबसाईटवर त्यांचे GPAT स्कोअरकार्ड तपासू शकतात. निकाल पाहण्यात काही अडचण आली तर उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सची मदत घेऊ शकतात.
असा चेक करा निकाल
- जीपीएटी gpat.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- होमपेजवर डाउनलोड GPAT 2022 स्कोअरकार्ड या लिंकवर क्लिक करा
- आपला रोल नंबर जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाका
- तुमचा GPAT 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट घ्या.
ही परीक्षा 9 एप्रिल रोजी घेण्यात आली होती
एनटीएने जारी केलेल्या सूचनेनुसार ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टीट्यूड टेस्ट 2022 साठी 53 हजारांहून अधिक नोंदणी झाली आणि 50 हजारांहून अधिक उमेदवारांनी GPAT 2022 ची परीक्षा दिली. GPAT परीक्षा 121 शहरांमध्ये 336 केंद्रांवर घेण्यात आली होती. उमेदवार GPAT परीक्षेसाठी अंतिम उत्तर-की (Answer Key) देखील तपासू शकतात. एनटीएने GPAT स्कोअरही जारी केला आहे. GPAT परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीनं घेण्यात आली होती.
फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा आहे
GPAT 2022 च्या स्कोअरच्या आधारे, उमेदवारांना देशभरातील विविध संस्थांमध्ये पीजी लेव्हल फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार किमान गुणांच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजशी संपर्क साधावा लागेल. GPAT पूर्वी एआयसीटीई 2018 सालापर्यंत आयोजित करण्यात येत होती.
संबंधित विषयांसह चार प्रमुख क्षेत्रांमध्ये चाचणी
जीपीएटी 2022 परीक्षा 9 एप्रिल 2022 रोजी घेतली गेली. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची त्यांच्या संबंधित विषयांसह चार प्रमुख क्षेत्रांमध्ये चाचणी घेण्यात आलेली आहे ज्यात फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल्स, फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजी ही चार क्षेत्रे आहेत. इतर विषयांवरही उमेदवारांची चाचणी घेतली गेलीये. 30 मार्च रोजी एनटीए ने उमेदवारांसाठी जीपीएटी 2022 परीक्षा केंद्रांच्या शहरांची यादी जाहीर केली होती यावरून बराच गोंधळ सुद्धा झाला होता. विद्यार्थ्यांना हवं ते परीक्षा केंद्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.