Helicopter Ride : पहिला नंबर पटकवा, हेलिकॉप्टर राईड मिळवा ! मुख्यमंत्री असावा तर अस्सा, छत्तीसगडचे पोरं खुश…
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असंही त्यांनी म्हटलंय. लवकरच छत्तीसगडमधील १०वी १२वीच्या मुलांचा निकाल लावण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री (Chief Minister) काँग्रेसचे भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ट्विट करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी (Good News) दिलेली आहे. जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर येतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची मोफत राईड मिळणार आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असंही त्यांनी म्हटलंय. लवकरच छत्तीसगडमधील 10वी 12वीच्या मुलांचा निकाल लावण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
? मिलेगी हर सपने को अब उड़ान #HelicopterRide pic.twitter.com/UOzDIVPmv6
हे सुद्धा वाचा— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 5, 2022
निकालाच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी पुढच्या दहा दिवसात निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या वर्षी सगळ्याच विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात आलं होतं त्यामुळे छत्तीसगड बोर्डाने गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली नव्हती. या वर्षी तब्बल 2 वर्षांनंतर गुणवंत विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ही घोषणा करण्यात आलीये. अनुक्रमे 10वी आणि 12वी मध्ये प्रत्येक शहरात जे अव्वल नंबर पटकावतील अशा विद्यार्थ्यांना ही हेलिकॉप्टर राईड मिळणार आहे आणि ते ही अगदी मोफत !
10वीं और 12 वीं में टॉप करने वाले विद्यार्थियों को सरकार हेलीकॉप्टर राइड कराएगी।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 5, 2022