Ideal school of Wablewadi| वाबळेवाडीच्या आदर्श शाळेची गोष्ट ; मुख्याध्यापक दत्तात्रय वारे व ग्रामस्थांच्या सहभागातून कशी उभी राहिली शाळा
आठ-नऊ वर्षांपूर्वी दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती अशी या गावची अवस्था होती. अशा स्थितीच मुलांना शिक्षण घ्यावे लागत होते. त्यानंतर दत्तात्रय वारे 2012 मधे वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाले. शाळेत सकारात्मक बदलाचे वारे वाहू लागले.
पुणे- जिल्ह्यातील शिक्रापूर तालुक्यात शिरूरमध्ये असलेली आदर्श वाबळेवाडीची शाळा ( ideal school of Wablewadi) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे (Dattatray Ware) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यात नेमकी शाळा कशी उभी राहिली. मुख्याध्यापक वारे , स्थानिक ग्रामस्थ यांनी यासाठी काया प्रयत्न केले वाचा सविस्तर …
कशी आहे वाबळेवाडीतील शाळा शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची ही भारतातील पहिली तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची झिरो एनर्जी शाळा म्हणून गणली जाते. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेकडे जातो. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही शाळा नावारूपाला आली आहे. जगभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या शाळेतील खोल्या ह्या पूर्णतः काचेच्या आहेत. या शाळेतील वर्गखोल्याची निर्मिती पर्यावरण पूरक करण्यात आली आहे. साधारण 22 फूट रुंद, 22 फूट लांब आणि 24 फूट उंच काचेचे वर्गखोल्या आहेत. या सर्व खोल्यांमध्ये प्रकाशाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. या शाळेत मुलांचा शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच सर्वांगीण विकास करण्यावरच सर्वाधिक भर दिला जातो. शाळेला आदर्श मॉडेल बनवण्यात मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचा मोलाचं वाटा आहे.
मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी घेतले कष्ट
वाबळेवाडीच्या शाळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून देण्यात मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचा मोलाचा वाटा आहे. साधारण 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी हे एक छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे.आठ-नऊ वर्षांपूर्वी दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती अशी या गावची अवस्था होती. अशा स्थितीच मुलांना शिक्षण घ्यावे लागत होते. त्यानंतर दत्तात्रय वारे 2012 मधे वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाले. शाळेत सकारात्मक बदलाचे वारे वाहू लागले. दत्तात्रय वारे यांनी पुढाकार घेता लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यास सुरुवात केली. पुढे 2016 साली त्यांचे शाळेप्रती असलेली निष्ठा, त्यांचे काम बघुन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बॅक ऑफ न्यूयॉर्कने शाळेसाठी निधी दिला. अन प्रगतीपथावर असलेली वाबळेवाडीत आदर्श शाळा उभी राहीली. या शाळेत फळा किंवा बाकडी न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. यामुळे खाजगी शाळांमधे शिकणारे विद्यार्थीही वाबळेवाडीतील या शाळेकडे वळले. इतकंच नव्हे तर या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टही लागू लागली.
खेळांचेही मिळते प्रशिक्षण
गोल्फचे प्रशिक्षण वगळता या शाळेत इतर सर्व खेळांचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते. शाळेतील मुलं अनेक खेळांमधे आणि कलांमधे पारंगत आहेत आणि त्याचं बरंचसे श्रेय वारे सरांना जाते. मुलांना नेमबाजी शिकवता यावी यासाठी स्वतः बालेवाडीला जाऊन नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊन येणे , मुलांना प्रशिक्षण देणं आणि राज्यस्तरावर पदक जिंकणारी मुलं त्यातून घडवणे हे मोठ्या जिद्दीचे काम ते करत आले आहेत.
लोकसहभाग महत्त्वाचा लोकसहभाग हा शाळेच्या विकसातील अत्यंत महत्वाचा घटक असतो. गावगाड्याच्या राजकारणातही गावाची शाळा या एका गोष्टीवर सर्वजण एकत्र येत. मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवतात. यातून शाळेच्या विकासास प्रेरणा मिळत असल्याचे मत अनेकदा वारे गुरुजींनी आपलया बोलण्यातून व्यक्त केले आहे.
TET Exam | टीईटी, म्हाडा परीक्षा घोटाळा; राज्यभरात सायबर सेलची 8 पथकं रवाना
School Reopen| स्कूल चले हम! एक ते सातच्या नागपूर मनपा शाळा आजपासून; काय असतील निर्बंध?