UGC NET परीक्षेची सिटी स्लिप जाहीर, कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या

UGC NET December 2024 Exam City Slip: भावी प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षा सिटी स्लिप जारी करण्यात आली आहे. ही सिटी स्लिप यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. ही परीक्षा 1 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत घेण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच प्रवेशपत्रही जाहीर करण्यात येणार आहे.

UGC NET परीक्षेची सिटी स्लिप जाहीर, कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या
UGC NET परीक्षेची सिटी स्लिप जाहीरImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 3:16 PM

UGC NET December 2024 Exam City Slip: तुम्ही यूजीसी नेटचा फॉर्म भरला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षेची सीटी स्लिप जारी केली आहे. जे उमेदवार परीक्षेला बसू इच्छितात ते यूजीसी नेट ugcnet.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सीटी इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करू शकतात.

यूजीसी नेट परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार

यूजीसी नेट ही परीक्षा 3 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. 85 विषयांची परीक्षा संगणकावर आधारित परीक्षा पद्धतीत दोन शिफ्टमध्ये, पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे.

श्नपत्रिकांचे माध्यम केवळ इंग्रजी आणि हिंदी

अधिकृत अधिसूचनेनुसार, परीक्षेत दोन विभाग असतील. दोन्ही विभागात ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. भाषिक प्रश्नपत्रिका वगळता सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचे माध्यम केवळ इंग्रजी आणि हिंदी असेल.

एनटीएने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे की, “एनटीए आता यूजीसी नेट डिसेंबर 2024 साठी परीक्षा शहराच्या वाटपासाठी आगाऊ सूचना दर्शवित आहे. उमेदवारांना यूजीसी नेट https://ugcnet.nta.ac.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांची यूजीसी नेट परीक्षा सिटी स्लिप (त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरुन) तपासण्याचा / डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

UGC NET December 2024 Exam City Slip: सिटी स्लिप कसे डाउनलोड करावे?

सर्वप्रथम यूजीसी नेटच्या अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.ac.in. या वर जावे त्यानंतर होम पेजवर उपलब्ध यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षा सिटी स्लिप लिंकवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे उमेदवारांना लॉगिन डिटेल्स टाकावे लागतील. आता सबमिटवर क्लिक करा आणि तुमची परीक्षा सिटी स्लिप दिसेल. आपल्या शहराची स्लिप तपासा आणि ते डाउनलोड करा. पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी सोबत ठेवा.

यूजीसी नेट ugcnet.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सीटी इन्फॉर्मेशन स्लिप डाउनलोड करू शकतात.

UGC NET December 2024: संपर्क क्रमांक काय ?

यूजीसी नेट डिसेंबर 2024 साठी परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करण्यासाठी किंवा तपासण्यात कोणत्याही उमेदवाराला अडचण येत असेल तर ते 011-40759000 किंवा ई-मेल ugcnet@nta.ac.in संपर्क साधू शकतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.