JEE Main 2022: पोरांनो त्या तिथे बघा, JEE Main येताना दिसतीये का! होऊन जाऊदे मग शेवटची रिव्हिजन, कशी करणार वाचा…

सुमारे 10 दिवस या परीक्षा चालणार आहेत. या परीक्षेला आता जवळपास आठवडाभराचा अवधी उरला आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी आम्ही परीक्षेच्या तयारी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या वेळेआधी चांगली रिव्हिजन करू शकाल आणि एकदम चांगले मार्क्स मिळवू शकाल.

JEE Main 2022: पोरांनो त्या तिथे बघा, JEE Main येताना दिसतीये का! होऊन जाऊदे मग शेवटची रिव्हिजन, कशी करणार वाचा...
पोरांनो त्या तिथे बघा, JEE Main येताना दिसतीये का! Image Credit source: blogspot
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:38 PM

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच जेईई मेन परीक्षा 2022 (JEE Main Exam 2022) चे ॲडमिट कार्ड जारी करणार आहे. ही परीक्षा 20 जून 2022 पासून घेण्यात येणार आहे. सुमारे 10 दिवस या परीक्षा चालणार आहेत. या परीक्षेला आता जवळपास आठवडाभराचा अवधी उरला आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी आम्ही परीक्षेच्या तयारी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही परीक्षेच्या शेवटच्या वेळेआधी चांगली रिव्हिजन (Revision) करू शकाल आणि एकदम चांगले मार्क्स मिळवू शकाल. सगळ्यात पहिले तर शांत व्हा! स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं छान तुमच्या लक्षात राहणार आहे, तुम्ही काहीही विसरणार नाही. फक्त काही गोष्टी आहेत ज्या शेवटच्या क्षणी करणं गरजेच्या आहेत. जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशनच्या तज्ज्ञाच्या मते जेईई मेन परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाचे विषय वाचणे खूप गरजेचे आहे. उदा.,

भौतिकशास्त्र (Physics)

  • डायमेन्शनल एनालिसिस (Dimensional Analysis)
  • ग्रॅव्हिटेशन अँड इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स (Gravitation& Electrostatics)
  • करंट इलेक्ट्रिसिटी अँड हीट ट्रान्स्फर (Current Elecrtricty& Heat Transfer)
  • भौमितिक (Geometrical Topics)

गणित (Maths)

  • त्रिकोणमितीय कार्ये (Trignometric Functions)
  • वर्तुळे आणि वर्तुळांचे कुटुंब (Circles And Family Of Circles)
  • अनुक्रम आणि मालिका (Sequence& Series)
  • गणितातील क्लिष्ट संख्या (Complex Numbers)

Chemistry

  • मोल कॉन्सेप्ट आणि कॉन्सेप्ट ऑफ इक्विवॅलेन्ट (Mole Concept& Concept Of Equivalent)
  • रेडॉक्स रिॲक्शन्स (Redox Reactions)
  • इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि थर्मोडायनॅमिक्स (Electrochemistry&Thermodynamics) केमिकल इक्विलिब्रियम (Chemical Equilibrium) इन फिजिकल केमिस्ट्री (Phyiscal Chemistry)

मॉक टेस्टच्या आधारे सराव करा

  • परीक्षेच्या प्रत्यक्ष पॅटर्नसारखीच मॉक टेस्ट असते विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी मॉक टेस्टद्वारे सराव सुरू ठेवावा
  • मॉक टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो
  • मॉक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थी कोणत्या विषयांमध्ये कमकुवत आहेत आणि कोणत्या विषयात मजबूत आहेत हे कळतं आणि मग त्यानुसार तयारी करणं सोपं जातं
  • परीक्षेआधी आपण कुठच्या विषयावर जास्त भर द्यायला हवा हे कळतं या सगळ्यामुळे आपला वेळ वाचतो

वेळेचे व्यवस्थापन अनिवार्य

  • जेईई मेन परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन हे दोन महत्त्वाचे घटक
  • परीक्षा वेळेत सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला वेग आणि वेळ याचं व्यवस्थापन नीट करावं, त्याकडे लक्ष द्यावं
  • विद्यार्थ्यांनी टायमरचा वापर करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • सॅम्पल पेपरच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना सराव करता येतो
  • अचूक आणि योग्य प्रश्न निवडता यायला हवेत
  • योग्य प्रश्न निवडला, योग्य उत्तर येईल, वेळ वाचेल, निगेटिव्ह मार्किंग येणार नाही.

एकावेळी एक विषय

  • परीक्षेची तयारी करताना एकावेळी एकाच विषयावर भर द्या.
  • आधीचा विषय नीट वाचल्यानंतरच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विषयाकडे वळावे.
  • विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दोन-तीन विषय वाचण्याचा प्रयत्न करू नये, असे केल्याने विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या विषयांबाबत बराच गोंधळ निर्माण होऊ शकतो.
  • एकावेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करावे

परीक्षेच्या तयारीसाठी…

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त ताण घ्यायचा नाही
  • तणाव घेतला, टेन्शन घेतलं,येतं ते विसरून जाल, कोणत्याही विषयात यश मिळू शकणार नाही
  • तणावमुक्त राहा
  • तयारी करताना मध्येच ब्रेक घेत राहा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.