HSC SSC Exam : शिक्षण ऑनलाईन झालं, दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको, कोल्हापूर नागपूरमध्ये विद्यार्थी पालकांचं आंदोलन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची (HSC) लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
नागपूर / कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं बारावीची (HSC) लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर, इयत्ता दहावीची (SSC) लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्याचं मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र, राज्यातील दहावी बारावीचे विद्यार्थी या परीक्षांविरोधात आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर आणि नागपूरमध्ये (Kolhapur and Nagpur Student Protest) विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांना विरोध केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
दहावी बारावी बोर्ड परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी कोल्हापुरातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं एसएससी बोर्ड कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे. शिक्षण ऑनलाईन झालं असताना परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल विद्यार्थ्यांच्यावतीनं करण्यात आला आहे. पालकांनी देखील ऑनलाईन परिक्षेचीच मागणी केली आहे.
नागपूरमध्येही आंदोलन
नागपुरात 10 वी 12 वी ची परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मेडिकल चौकात काही विद्यार्थी एकत्रित येऊन घोषणाबाजी करत आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
पालकांची देखील ऑनलाईन परीक्षांची मागणी
दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन नको अशी भूमिका विद्यार्थ्यांसोबत पालकांद्वारे मांडण्यात आली आहे. कोल्हापूर आणि नागपूरमध्ये पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
इतर बातम्या :
HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरण
HSC SSC exam Kolhapur and Nagpur student demanded exam conduct online mode