Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनचं, बोर्डाची तयारी सुरु असल्याची माहिती; 17 नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची (MSHBHSE) ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे.

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनचं, बोर्डाची तयारी सुरु असल्याची माहिती; 17 नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 1:28 PM

पुणे: दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची (MSHBHSE) ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या दहावी बारावीच्या परीक्षासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 17 नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु

माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळालेला नाही. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं बोर्डाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.

17 नंबरच्या फॉर्मसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

17 नंबरचा फॉर्म भरुन 12 वी आणि 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 12 जानेवारी पर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : – दहावी :- http://form17.mh-ssc.ac.in – बारावी :- http://form17.mh-hsc.ac.in

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं सांगितलं आहे.

इतर बातम्या:

NEET PG Counselling 2021 Live : EWS,OBC आरक्षणाद्वारे नीट पीजी समुपदेशनाला मंजुरी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

CET : अकरावी प्रवेशाच्या सीईटीचं शुल्क परत देण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांना किती रुपये मिळणार?

HSC SSC Exam Maharashtra update Corona cases increased but sources said MSBHSE prepare for offline exam 17 number exam from submission extended

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.