ICAI CA Admit card 2021: आयसीएआयकडून डिसेंबर सत्रातील परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध डिसेंबर महिन्यातील विविध परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केलं आहे.

ICAI CA Admit card 2021: आयसीएआयकडून डिसेंबर सत्रातील परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?
आयसीएआय
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 1:44 PM

ICAI CA Admit card 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध डिसेंबर महिन्यातील विविध परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केलं आहे. आयसीएआयच्या परीक्षांसाठी अर्ज केलेले विद्यार्थी icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. परीक्षा 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे.

ICAI CA Admit card 2021 अशा प्रकारे करा डाऊनलोड

स्टेप 1 : प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org ला भेट द्या.

स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : आता आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉगिन करा.

स्टेप 4 : आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5 : आता ते डाऊनलोड करा.

स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचं आवाहन

आयसीएआयकडून डिसेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या “फाऊंडेशन, इंटरमीडिएट (IPC), इंटरमीडिएट, फायनल परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र उमेदवारांची छायाचित्र आणि स्वाक्षरीसह जारी करण्यात आली आहेत. icai कडून कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. उमेदवारांना वेबसाईटवरुन त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड प्रिंट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ICAI कडून ‘या’ विद्यार्थ्यांची फी माफ

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाकडून ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू संसर्गानं त्यांचे आई वडिल गमावले आहेत त्यांना फीमध्ये सूट देण्यात आली आहे. आसीएआयकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्तरातील परीक्षांसाठी फी माफ करण्यात आली आहे. विद्यार्थी ICAI च्या वेबसाईटवर यासंबंधी नोटिफिकेशन पाहू शकतात. याचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2023 पर्यंत मर्यादित राहिल.

इतर बातम्या:

CDAC Recruitment 2021: सीडॅक मुंबई येथे 111 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

IBPS PO Admit Card 2021: आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर भरती पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 4135 पदांसाठी परीक्षा

MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या अंतिम उत्तरतालिकेवर विद्यार्थ्यांचा आक्षेप, गौताळा राष्ट्रीय उद्यान नसून अभयारण्य असल्याचा दावा

ICAI CA Foundation intermediate and final exam Admit card 2021 released check details here

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.