ICAI Result 2021| सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षा 2021 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. (icai result 2021 ca foundation)
ICAI 2021 Result नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षा 2021 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर उपलब्ध आहे. सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर सुद्धा पाहता येईल. आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील. (ICAI Result 2021 CA Foundation and final old new course result declared check out icai org for more details )
निकाल कसा पाहावा?
>>> सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा
>>> यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा
>>> त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा
>>> त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका
>>> तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Final किंवा CA Foundation परीक्षेचा निकाल दिसेल.
>>> निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा
ICAI CA Foundation, Final (old New Coruse) Result SMS द्वारे पाहा
सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. फाऊंडेशनचा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या. तुम्हाला तुमचा निकला एसएमएसद्वारे मिळेल.
निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार
विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.
इतर बातम्या :