ICSE, ISC Board Exams : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई आणि आईएससी बोर्ड परीक्षा स्थगित

कोरोना महामारी पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), मध्य प्रदेश बोर्ड, राजस्थान बोर्ड, हिमाचल प्रदेश बोर्ड आणि महाराष्ट्र मंडळानेही परीक्षा स्थगित केल्या आहेत. (ICSE and ISC board exams postponed in the wake of the Corona epidemic)

ICSE, ISC Board Exams : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयसीएसई आणि आईएससी बोर्ड परीक्षा स्थगित
प्रातिनिधिक फोटो.
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 8:18 PM

ICSE, ISC Board Exam 2021 Postponed नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रसारामुळे काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (Council for the Indian School Certificate Examinations)ने आयसीएसई इयत्ता दहावी आणि आयएससी इयत्ता बारावीच्या अंतिम परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आयसीएसई दहावीची अंतिम परीक्षा 4 मे ते 7 जून या कालावधीत घेण्यात येणार होती. त्याचबरोबर आयएससी किंवा इयत्ता 12 वीच्या अंतिम परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. काउंसिल म्हटले आहे की कोरोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि या परीक्षांचा अंतिम निर्णय जून 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल. इयत्ता 12 वीची परीक्षा (ऑफलाइन) नंतर घेण्यात येईल, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पर्यायी आहे. इयत्ता दहावीचे जे विद्यार्थी परीक्षेत उपस्थित राहू शकत नाही, सीआयएससीई त्यांच्या निकालासाठी निकष विकसित करेल. (ICSE and ISC board exams postponed in the wake of the Corona epidemic)

येथे रद्द झाल्या दहावीच्या परीक्षा

तेलंगणा सरकारने कोविड -19 प्रकरणातील वाढ पाहता इंटरमीडिएट प्रथम वर्ष (इयत्ता ११ वी) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रमोट करण्याचा आणि दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विशेष मुख्य सचिव चित्रा रामचंद्रन म्हणाले, राज्यातील सध्याची साथीची परिस्थिती आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना महामारी पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), मध्य प्रदेश बोर्ड, राजस्थान बोर्ड, हिमाचल प्रदेश बोर्ड आणि महाराष्ट्र मंडळानेही परीक्षा स्थगित केल्या आहेत. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनी सांगितले आहे की ते परिस्थितीवर नजर ठेवत आहेत आणि याक्षणी त्यांनी बोर्ड परीक्षा घ्यायचे की नाही याचा निर्णय घेतला नाही.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर परीक्षा स्थगित

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर गेल्या दोन दिवसांत झारखंड सरकारने दहावी-बारावीच्या प्रयोगिक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ओडिशा आणि उत्तर प्रदेशात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा स्थगित करणे, हरियाणामध्ये दहावीची परीक्षा रद्द करणे आणि बारावी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलणे, राजस्थान सरकार माध्यमिक शिक्षण मंडळा अजमेरच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी बोर्डाने परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 17 मे 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. (ICSE and ISC board exams postponed in the wake of the Corona epidemic)

इतर बातम्या

चहा, पाणी किंवा शक्य असल्यास पोलिसांना जेवण द्या, हेमंत नगराळेंचे जनतेला आवाहन

Double mutant corona : महाराष्ट्राची झोप उडवणारा डबल म्युटेंट कोरोना प्रकार नेमका काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.