अग्नीवीरांसाठी खूशखबर, इग्नूने सुरू केला पदवी कोर्स, या विषयांचा होणार अभ्यास

उमेदवार इग्नूच्या igou.ac.in वेबसाईटवर रजीस्ट्रेशन करू शकतात. नोंदणी करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.

अग्नीवीरांसाठी खूशखबर, इग्नूने सुरू केला पदवी कोर्स, या विषयांचा होणार अभ्यास
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 4:12 PM

नवी दिल्ली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयात अग्नीवीर वायूसेनेसाठी पदवी कोर्स सुरू केला आहे. यासाठी उमेदवार इग्नूच्या igou.ac.in वेबसाईटवर रजीस्ट्रेशन करू शकतात. नोंदणी करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. सशस्त्र दलाच्या मदतीने हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अग्नीवीर वायूसेनेत असताना हा कोर्स पूर्ण करू शकतात. १२० गुणांचा हा अभ्यासक्रम असेल. त्यापैकी ६० गुणांचा अभ्यासक्रम इग्नूकडून सादर करण्यात आला आहे. उर्वरित ६० गुण हे सशस्त्र दलाच्या वतीनं सर्वीसदरम्यान दिले जातील.

हे कोर्स सुरू करण्यात आले

बॅचलर ऑफ आर्ट्स

बॅचलर ऑफ आर्ट्स पर्यटन

बॅचलर ऑफ आर्ट्स एमएसएमई

बॅचलर ऑफ कॉमर्स

बॅचलर ऑफ सायन्स

सशस्त्र दलाच्या पाठ्यक्रमाला कौशल्य शिक्षण नियामक संस्था, राष्ट्रीय व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद यांनी अनुमोदन दिलं आहे. हे शिक्षण कौशल्य शिक्षणासोबत उच्च शिक्षणासाठी एनईपीने २०२० ला शिफारस केलेले आहेत.

अशी करा नोंदणी

इग्नूच्या अधिकृत igou.ac.in वेबसाईटवर जा

होम पेजवरील न्यूज आणि अनाउंसमेंट पेजवर जा

अग्निवीर प्रोग्राम पोर्टलवर जा

त्यानंतर रजीस्ट्रेशन लिंकवर क्लीक करा

विचारलेली माहिती भरा

इग्नू आणि सशस्त्र दलाच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीरची सेवा देत असताना पदवी मिळवता येईल. यामुळे अग्निवीराची सेवा समाप्त झाल्यानंतर रोजगार मिळण्यास मदत होईल. या कोर्सशी संबंधित अधिक माहितीसाठी इग्नूच्या वेबसाईटवरील नोटीफिकेशन चेक करू शकता. अर्जाची नोंदणी ऑनलाईनच करावी लागेल.

दहावी-बारावीनंतर अग्नीवीरांची भरती होणार आहे. त्यामुळे चार वर्षे सेवा दिल्यानंतर त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सेनेत सेवा देत असताना त्यांना पदवी मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा अग्नीवीरांना होणार आहे. नोंदणीची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. नोंदणी करून या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ अनियमित विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्याचाच एक भाग म्हणून अग्नीवीरांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे अग्नीवीरांकडून स्वागत करण्यात आले आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.