IIT मध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात, पहिल्याच दिवशी आयआटी मुंबईच्या विद्यार्थ्याला 2 कोटींचं पॅकेज

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला उबर कंपनीकडून 2.05 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. तर, आयआटी रुरकीच्या विद्यार्थ्याला आंतरारष्ट्रीय टेक फर्मकडून 2.15 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं आहे

IIT मध्ये कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात, पहिल्याच दिवशी आयआटी मुंबईच्या विद्यार्थ्याला 2 कोटींचं पॅकेज
IIT Bombay
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 11:20 AM

मुंबई: भारतातील आयआयटी संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट (IIT Campus Placement) सुरु झाल्या आहेत. कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीचं विद्यार्थ्यांना देशातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठं पॅकेज देण्यात आलंय. आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) विद्यार्थ्याला उबर कंपनीकडून 2.05 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. तर, आयआटी रुरकीच्या (IIT Roorkee) विद्यार्थ्याला आंतरारष्ट्रीय टेक फर्मकडून 2.15 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं गेलं आहे. तर आयआयटी गुवाहटीच्या विद्यार्थ्यांना 2 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पॅकेजमध्ये मोठी वाढ

आयआयटी संस्थांमधील कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशीचं गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जॉब आणि पॅकेजस विद्यार्थ्यांना देण्यात आली. गतवर्षी सर्वाधिक पॅकेजची रक्कम अमेरिकेतील आयटी फर्म कोहेस्टी यांनी 1.54 कोटी रुपये दिलं होतं. ते पॅकेज देखील आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यालाच मिळालं होतं.

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याला 2 कोटींचं पॅकेज

आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याला उबरकडून 2.05 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे. तर, भारतातील स्थानिक कंपन्यांकडून सर्वाधिक 62 लाख रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे.

आयआयटी रुरकीच्या 11 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळालं आहे. तर, आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांना पहिल्या सर्वाधिक जॉब मिळाले. आयआयटी मद्रासच्या 176 विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी निवड झाली.

या कंपन्यांचा सहभाग

यावर्षीच्या टॉप रिक्रूटर्समध्ये मायक्रोसॉफ्ट, क्वालकॉम, गुगल, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, एअरबस, अमेझॉन, अ‌ॅपल, एपीटी पोर्टफोलिओ बजाज ऑटो लिमिटेड, उबर आणि रुब्रिक या कंपन्यांचा समावेश होता. उत्पादन अभियंता, संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर अभियंता, हार्डवेअर अभियंता, व्यवसाय विश्लेषक, आर्थिक विश्लेषक, विपणन विश्लेषक, पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, सल्लागार, उत्पादन व्यवस्थापन, डेटा सायन्स इत्यादी पदांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

40 लाख विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी इन्फोसिसचा हातभार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचंय, 2022-23 पासून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र

IIT Bombay Student get job offer from Uber with Package of 2.5 Crore rupees per annual package

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.