मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यात. 10 वी निकाल आता शाळांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार घोषित करण्यात येणार आहेत. याचा परिणाम 11 वीच्या प्रवेशावरही झालाय. त्यामुळे राज्य सरकारने अखेर अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार 11 वी प्रवेशात एकवाक्यता येण्यासाठी सरकार वैकल्पिक (optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेणार आहे (Important announcement about 11th admission in Maharashtra by Varsha Gaikwad).
इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल. pic.twitter.com/7L4PmAUAmT
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 24, 2021
विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी सीईटीची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, “सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.”
Important announcement about 11th admission in Maharashtra by Varsha Gaikwad