CBSE 12th Result 2021 : बारावीच्या निकालासंदर्भात सीबीएसईची महत्वाची नोटीस, येथे पहा
सीबीएसईने जाहीर केलेल्या पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल, ज्यासाठी अंतर्गत मूल्यांकन व प्रोजेक्ट यासह दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केला जाईल.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीच्या निकालाला (CBSE Board Result 2021) अंतिम स्वरुप देण्यासाठी अंतिम तारीख 22 जुलै ते 25 जुलै (संध्याकाळी 5) पर्यंत वाढवली आहे. सीबीएसईने आपल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, शाळा आपल्या डेटाला अंतिम स्वरुप देण्याचे काम करीत आहेत, परंतु अंतिम तारीख जवळ आल्यामुळे शिक्षक दबावाखाली चुका करीत आहेत आणि मग त्या दुरुस्त करण्यासाठी सीबीएसईला विनंती करत आहेत. अशा परिस्थितीत सीबीएसईने निर्णय घेतला आहे की, निकाल निश्चित करण्याची अंतिम तारीख (सीबीएसई 12 वी निकाल 2021) 22 जुलै ते 25 जुलै 2021 (सायंकाळी 5 वाजे) पर्यंत वाढविण्यात आली आहे. शाळांना त्यांचे काम सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे आणि जर एखाद्या शाळेचे काम पूर्ण झाले नाही तर त्या शाळेचा निकाल वेगळा जाहीर केला जाईल. (Important notice from CBSE regarding 12th result)
पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर करणार
सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि इतर राज्य मंडळाला 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. 25 जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले जाईल. त्यानुसार 25 ते 31 जुलै दरम्यान निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. अधिकृतपणे याबद्दल कोणतीही माहिती नाही. कोरोनाची दुसरी लाट पाहता इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसईने जाहीर केलेल्या पर्यायी मूल्यांकन धोरणांच्या आधारे निकाल जाहीर केला जाईल, ज्यासाठी अंतर्गत मूल्यांकन व प्रोजेक्ट यासह दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केला जाईल.
CBSE 12th Result 2021 असे तपासा
खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सने विद्यार्थी त्यांचे निकाल तपासू शकतील.
– निकाल तपासण्यासाठी प्रथम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जावे लागेल. – त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. – आता विनंती क्रमांक जसे रोल नंबर इत्यादी सबमिट करावी लागेल. – आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल. – आता हे तपासा. (Important notice from CBSE regarding 12th result)
मोहन भागवत म्हणतात, सर्व भारतीयांचा DNA एकच; मुसलमानांना सीएएवर आक्षेप नाहीhttps://t.co/ndGpL3CEbu#MohanBhagwat | #rss | #caa | #Muslims
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
इतर बातम्या