11th Admissions: अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाची अपडेट! प्रवेशाबाबतचे ठळक मुद्दे आणि महत्त्वाच्या तारखा

अर्जाचे एकूण दोन भाग होते. पहिला भाग भरून झालेला आहे, पहिल्या भागासाठी विद्यार्थ्यांना कशाचीही प्रतीक्षा करायची गरज नव्हती परंतु दुसरा भाग हा निकालावर अवलंबून होता. आता निकाल लागलेला आहे आणि अकरावी प्रवेशाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये.

11th Admissions: अकरावी प्रवेशाबाबत महत्त्वाची अपडेट! प्रवेशाबाबतचे ठळक मुद्दे आणि महत्त्वाच्या तारखा
Educational LoanImage Credit source: indianexpress.com
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 7:34 AM

मुंबई: दहावीचा निकाल (SSC Results 2022) नुकताच लागला. कोरोनानंतर पहिल्यांदाच दहावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. या निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती. अखेर निकाल लागला आणि आता उत्सुकता आहे ती अकरावी प्रवेशाची. अकरावी प्रवेशासाठी शिक्षण मंडळाने ऑनलाइन सराव अर्जाची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. मॉक अर्ज! (Mock Application For 11th Admissions) अर्जाचे एकूण दोन भाग होते. पहिला भाग भरून झालेला आहे, पहिल्या भागासाठी विद्यार्थ्यांना कशाचीही प्रतीक्षा करायची गरज नव्हती परंतु दुसरा भाग हा निकालावर अवलंबून होता. आता निकाल लागलेला आहे आणि अकरावी प्रवेशाबाबत (11th Admissions) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये. राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी प्रवेशाचे पुढील वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. काय आहेत अकरावी प्रवेशाचे ठळक मुद्दे आणि वैशिष्ट्ये बघुयात…

अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया

  • शून्य फेरी- सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार, याचदरम्यान व्यवस्थापन इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
  • नियमित फेरी- शून्य फेरीनंतर तीन नियमित फेऱ्यांचे आयोजन. प्रत्येक फेरीवेळी कॉलेज पसंतीक्रम बदलता येणार
  • विशेष फेरी- नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रवेश प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत संधी.
  • अतिरिक्त विशेष फेरी- एटीकेटी आणि प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी. द्विलक्षी विषयांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून पूर्ण केले जाणार.

ठळक मुद्दे

  1. यंदा नियमित प्रवेशफेऱ्या आणि विशेष फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
  2. नियमित फेरीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी शून्य फेरी घेतली जाणार असून या फेरीत प्रवेश होणार नसले तरी गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
  3. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशाची सुरुवात झाली असून आतापर्यंत मुंबई विभागातून 2 लाख 40 हजार 569 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  4. लवकरच कॉलेज पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून शून्य फेरीवेळी विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्ज भरणे, कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.
  5. पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन जुलैमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
  6. विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 30 जूनपर्यंत अर्ज भरू शकतात
  7. 1 जुलैपासून ते 4 जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.
  8. विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात

यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, कॉलेजांमधील भौतिक सोयीसुविधा यांची तपासणी सुरू असल्याने प्रवेशाचे पुढील वेळापत्रक लटकले आहे. येत्या दोन दिवसांत हे काम आटोपल्यावर गुणवत्ता याद्या कधी जाहीर होणार याविषयीचे सविस्तर वेळापत्रक दिले जाणार आहे.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.