CUET UG 2022: एनटीएचा बेजाबदारपणा! परीक्षा समाजशास्त्राची, प्रश्न मानसशास्त्राचे…
पेपरमध्ये बिघाड झाल्याने प्रवेशात अडचणी येऊ शकतात. एनटीएच्या चुकीमुळे आपल्याला कमी गुण मिळू शकतात किंवा आम्ही परीक्षेत नापास होऊ शकतो, त्यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट यूजी (CUET UG) मध्ये समाजशास्त्र परीक्षेत मानसशास्त्राचे (Psychology) प्रश्न आल्यानं एकच गोंधळ उडालाय. अनेक विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत. त्यांच्यासाठीही सीयूईटी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर अनेक विद्यार्थी करत आहेत. एनटीएने (NTA) अद्याप या समस्येवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थी सांगतात की, ज्या परीक्षेची तयारी करायला गेलो होतो, त्या परीक्षेचा प्रश्न आलाच नाही, त्यामुळे परीक्षेत मार्क्स कसे मिळणार? पेपरमध्ये बिघाड झाल्याने प्रवेशात अडचणी येऊ शकतात. एनटीएच्या चुकीमुळे आपल्याला कमी गुण मिळू शकतात किंवा आम्ही परीक्षेत नापास होऊ शकतो, त्यामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
सोशल मीडियावर विद्यार्थ्यांची मागणी
सोशल मीडियावर अनेक ट्विट व्हायरल होत आहेत, ज्यात विद्यार्थी आपल्या समस्या मांडत आहेत. एका विद्यार्थ्याने लिहिले की, सोशिओलॉजीच्या पेपरमध्ये सायकॉलॉजीच्या प्रश्नामुळे आमची परीक्षा बिघडली. त्याचबरोबर एनटीएने समाजशास्त्राच्या पेपरबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही, समाजशास्त्राची परीक्षा कधी होणार, असे इतर विद्यार्थ्यांनी विचारले.
#CUETUG2022 Khela Hobe! I had my sociology paper Today but guess what, the questions asked on my sociology paper were from psychology?. This is our National Testing Agency @DG_NTA ? Ruining the lives of students? Cool??
— ??? ??????? (@ShekharlyRaj) August 5, 2022
Dear NTA, Why is there still not update about re-examination of sociology paper? How can you be so irresponsible with conducting a national level examination?
Re-conduct sociology paper@DG_NTA @dpradhanbjp #cuet
— Ajay Singh (@AjayOfficial05) August 15, 2022
Is it just me or has #NTA really forgotten abt what to do with those students who got psychology questions in their sociology exam on 5th August. #CUET #CUETUG2022 #NTAJawabDo #CUETADMITCARD
— Bhuvi (@BhuvaneshDixit4) August 17, 2022
समाजशास्त्राचा पेपर पुन्हा घ्या
त्याचवेळी विद्यार्थ्यांनी आपला राग व्यक्त करत सांगितले की, अद्याप परीक्षेबाबत अपडेट का नाही? राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्यात तुम्ही इतके बेजबाबदार कसे काय असू शकता? समाजशास्त्राचा पेपर पुन्हा घ्या.