त्वरा करा… त्वरा करा.. अवघ्या एक रुपयात नोकरी… मुंबईतच मिळतेय ऑफर; कुणी दिलीय ऑफर ?

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारे उदय पवार सध्या खूप चर्चेत आहेत. उदयने एक ॲप तयार केले आहे जिथे लोक फक्त 1 रुपया खर्च करून त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळवू शकतात.

त्वरा करा... त्वरा करा.. अवघ्या एक रुपयात नोकरी... मुंबईतच मिळतेय ऑफर; कुणी दिलीय ऑफर ?
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 3:42 PM

मुंबई : आपल्या देशाच्या अवाढव्य लोकसंख्येतील एक मोठा वर्ग बेरोजगार (unemployed) आहे आणि नोकरीच्या (searching for job) शोधात आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने एक दिवस आधी जारी केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत भारतात बेरोजगारांची संख्या 5.3 कोटी होती. यामध्ये महिलांची संख्या 1.7 कोटी आहे. कोरोनाच्या काळात बेरोजगारीचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत 1 रुपयात नोकरीची (Job in 1 rupee) संधी देणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाच्या अनोख्या उपक्रमाची जोरदार चर्चा आहे.

खरंतर, मुंबईच्या झोपडपट्टीत राहणार्‍या उदय पवार यांनी एक ॲप तयार केले आहे जिथे तुम्ही फक्त 1 रुपया खर्च करून तुमच्या पात्रतेनुसार नोकरी मिळवू शकता. उदयचा विश्वास आहे की या ॲपच्या माध्यमातून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीतील म्हणजेच धारावीतील कमी शिक्षित आणि बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी मिळेल. जर कोणाला नोकरी मिळवायची असेल तर आता एक ॲप तुमची मदत करू शकतो.

ॲपद्वारे कशी मिळणार नोकरी ?

‘ टिंग टाँग ‘ असे उदयच्या ॲपचे नाव आहे. तो म्हणतो की, या ॲपमध्ये तुम्हाला जवळचे क्लिनिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वकील, सीए यासह अनेक व्यवसायांच्या नोकऱ्यांची माहिती मिळेल. लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार त्या व्यवसायाची नोकरी मिळू शकते. या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या घराजवळील पाणीपुरी विक्रेत्याचीही माहिती मिळेल.

एका रुपयात मिळू शकते नोकरी !

उदय म्हणतो, “आम्ही आमच्या ॲपमध्ये मुंबईतील विक्रेत्यांची नोंदणी करत आहोत. अनेकांना घरबसल्या रोजगार मिळत आहे. मला माहित आहे की मी ज्या प्रकारचे ॲप तयार केले आहे, तसेच ॲप मोठ्या कंपन्यांचेही आहे. पण त्या ॲप्सद्वारे तुम्हाला काम किंवा नोकरी मिळाली तर मोठ्या कंपन्या कमिशन घेतात. त्यामुळे तुमच्या हातात खूप कमी रक्कम येते. म्हणूनच मी माझ्या ॲपमध्ये कोणतेही कमिशन देत नाही. येथे तुमची नोंदणी फी देखील नाममात्र आहे. दररोज अवघा एक रुपया म्हणजेच एका वर्षात तुम्हाला फक्त फक्त 365 रुपये वार्षिक भरावे लागतील आणि तुम्हाला नोकरीची माहिती मिळेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.