Success Story | रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले, जर्मनीतील करीयर सोडून युपीएसएसी क्रॅक केली, IPS पूजा यादव यांची कामगिरी
देशातील सर्वात अवघड अशी मानली जाणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही. आयपीएस पूजा यादव यांच्या या प्रवासात अनेक अडथळे आले तरी त्यांनी त्यावर मात करीत पोलीस अधिकारी झाल्या.
नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : व्यवसाय असो किंवा प्रशासकीय क्षेत्र महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. युपीएससीची सिव्हीस सर्व्हीस परीक्षा उत्तीर्ण होणे हा कठीण प्रकार आहे. तरी दरवर्षी देशभरातील अनेक मेहनती तरुण ही परीक्षा देत असतात. मात्र त्यातील काही मोजक्याच जणांना यश येते. ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. साल 2018 च्या बॅचच्या आयपीएस पूजा यादव यांचा प्रवास देखील तरुण-तरुणींसाठी आदर्श असा आहे.
20 सप्टेंबर 1988 रोजी जन्मलेल्या पूजा यादव यांचे शिक्षण हरियाणात झाले. फूड आणि बायोटेक्नॉलॉजीत त्यांनी एम.टेक केले. पूजा यांची फॅमिली त्यांच्या सोबत होती. त्यांनी लिमिटेड रिसोर्स असल्याने रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले, तरुणांचे क्लासेस घेत एम.टेक पूर्ण करीत युपीएससी दिली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजा कॅनडा येथे जॉब केला. त्यानंतर काही वर्षांनी जर्मनी येथे त्यांना नोकरी मिळाली. चांगली नोकरी आणि पगार सोडून पूजा यांनी देशातील सर्वसामान्यांसाठी सेवा करायची म्हणून त्यांनी भारतात येऊन युपीएससीची तयारी केली.
पूजा यादव यांना पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पास होता आली नाही. परंतू त्यांनी हार मानली नाही.त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला आणि दुसऱ्या प्रयत्नात त्या देशातून 174 रॅंक मिळून युपीएससी उत्तीर्ण झाल्या. पूजा सध्या गुजरात कॅडरमध्ये आहेत. त्यांना येथेपर्यंत पोहचताना अनेक अडथळे आले. परंतू त्या डगमगल्या नाहीत.
आयएएसशी विवाह केला
साल 2021 मध्ये पूजा यादव यांनी 2016 बॅचचे आयएएस असलेल्या विकल्प भारद्वाज यांच्याशी विवाह केला. ते सध्या केरळ कॅडर मध्ये आहेत. त्यांनी गुजरात कॅडरमध्ये बदली करण्यासाठी अर्ज केला आहे. मसुरीतील लाल बहादूर शास्री नॅशनल अकॅडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन येथे या दोघांची भेट झाली, त्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पूजा यादव सोशल मिडीयावर एक्टीव असतात.