‘ही’ नाही, ‘हा’ म्हणा… लिंग बदल करणारी महिला अधिकारी कोण?; आधी इंजीनियर आता…
एका वरिष्ठ IRS अधिकारी असलेल्या महिलेने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानंतर लोक हैराण झाले आहेत. मात्र, या महिला अधिकारीने असा निर्णय अखेर का घेतला? या प्रश्न सातत्याने विचारला जातोय. हेच नाहीतर या महिला अधिकारीने आपले नाव देखील बदलले आहे.
हैद्राबादमध्ये तैनात असलेल्या एका वरिष्ठ IRS महिला अधिकारीने अत्यंत मोठा निर्णय घेतला. हेच नाहीतर भारताच्या नागरी सेवेच्या इतिहासामध्ये ही घटना पहिल्यांदाच घडल्याचे देखील बघायला मिळतंय. या अधिकारी महिलेने असा निर्णय का घेतला? याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. भारताच्या नागरी सेवेच्या इतिहासात महिला अधिकारी पुरुष होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वरिष्ठ IRS महिला अधिकारी एम. अनुसूया यांनी लिंग परिवर्तन केले आहे. आता त्या स्त्रीपासून पुरुष झाल्या आहेत. आता लिंग परिवर्तननंतर त्यांनी त्यांचे नाव देखील बदलले आहे. एम अनुकाथिर सूर्या असे त्यांचे नाव असणार आहे.
विशेष म्हणजे आता या गोष्ठीसाठी सरकारकडूनही मान्यता ही देण्यात आलीये. कोणत्याही सरकारी नोदींमध्ये आता महिला म्हणून त्यांचा उल्लेख केला जाणार नाहीये. सर्वत्र त्यांच्या नावासमोर आता महिला ऐवजी पुरुष लिहिले जाणार आहे. एम अनुकाथिर सूर्या हे जॉइंट कमिशनर म्हणून हैद्राबादला नियुक्त आहेत.
हैद्राबादच्या सेंट्रल कस्टम अँड सर्व्हिस टॅक्स अपील ट्रिब्युनलमध्ये जॉइंट कमिशनर म्हणून आता लिंग बदलानंतर परत एम अनुकाथिर सूर्या नियुक्त झाले आहेत. सरकारी रेकॉर्डमध्ये लिंग बदलण्याची मागणी करणारा एक अर्ज एम अनुकाथिर सूर्याने केला होता. त्यानंतर आता सरकारकडून यासाठी परवानगी देण्यात आलीये.
आता सर्व सरकारी रेकॉर्डवर एम अनुकाथिर सूर्या नाव असणार आहे. विशेष म्हणजे एम अनुकाथिर सूर्या यांनी तब्बल 11 वर्षे नोकरी केल्यानंतर लिंग परिवर्तनाचा निर्णय घेतलाय. एम अनुकाथिर सूर्या हे 2013 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. त्यांनी अनेक विभागांमध्ये चांगले काम देखील केले आहे.
डिसेंबर 2013 ते मार्च 2018 पर्यंत एम अनुकाथिर सूर्या हे चेन्नई येथे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त होते. एप्रिल 2018 ते डिसेंबर 2023 पर्यंत तामिळनाडूमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहिले. जानेवारी 2023 मध्ये त्यांची नियुक्ती हैद्राबाद येथे सहआयुक्त झाली. तेव्हापासून याच पदावर एम अनुकाथिर सूर्या आहेत. विशेष म्हणजे अगोदर यांनी इंजीनियर म्हणूनही काम केले.