JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची 630 परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी, विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची 630 परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी, विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर
NEET UG Answer Key
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 10:09 AM

JEE Advanced 2021 नवी दिल्ली: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा आज होतं आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाईल. जेईई मेन परीक्षेमध्ये मध्ये 2.5 लाखांच्या आत ज्यांची रँक असते ते उमेदवार जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा हेऊ शकतात. या वर्षी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेचं आयोजन आयआयटी खरगपूर करत आहे. अडीच लाख

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होणार

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेच्या प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र घेऊन जावं लागेल. परीक्षा सुरू होण्याच्या किमान एक तास आधी परीक्षा हॉलवर उपस्थित राहावं लागेल. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये फक्त एक पेन्सिल, पेन, पिण्याच्या पाण्याची पारदर्शक बाटलीअसेल. इयरफोन, ब्लूटूथ डिव्हाइसेस, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक घड्याळे, पाकीट, हँडबॅग यासारख्या वस्तू परीक्षा हॉलमध्ये नेण्यास मनाई आहे.

परीक्षेचा तपशील

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा या वर्षी आयआयटी खरगपूरतर्फे 630 परीक्षा केंद्रावर घेतली जात आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन उत्तीर्ण झालेल्या 2,50,621 उमेदवारांपैकी 1,60,838 ने जेईई प्रगत साठी नोंदणी केली होती. यातील 1,50,838 विद्यार्थ्यांपैकी 43,204 उमेदवार दोन्ही पेपरसाठी पात्र ठरले होते.

दोन सत्रात परीक्षा

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर एक साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दोन दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार जेईई अ‌ॅडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

जॉइंट एक्झाव्हाएंट्रन्स ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्सड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला जाणार होता.

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

 इतर बातम्या:

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, परीक्षा कधी होणार?

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेचं प्रवेशपत्र लवकरच जाहीर होणार, परीक्षा कधी?

JEE Advanced 2021 exam today check details about exam on jeeadv ac in

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.