JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया आजपासून, अर्ज कुठे करायचा?

जेईई मेन्स परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत आहेत.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया आजपासून, अर्ज कुठे करायचा?
Jee Advanced Result
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 9:31 AM

JEE Advanced 2021 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल मध्यरात्री उशिरा जाहीर करण्यात आला. जेईई मेन परीक्षेत एकूण 18 विद्यार्थ्यांना टॉप 1 रँक मिळाली आहे. तर, 44 जणांना 100 परफेक्ट एनटीए गुण मिळाले आहेत. जेईई मेन्स परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण होऊन निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा अ‌ॅडव्हान्सडसाठी नोंदणी 15 सप्टेंबर 2021 म्हणजेच आजपासून सुरू होईल. जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे या वर्षी जेईई मुख्य परीक्षा 2021 चार टप्प्यांत घेण्यात आली होती.

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची जबाबदारी आयआयटी खरगपूर

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी प्रक्रिया भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूरद्वारे पूर्ण केली जाणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in द्वारे अर्ज करू शकतात.

जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी नोंदणी कशी करावी?

विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.

स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर भेट द्या .

स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.

स्टेप 4: यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.

स्टेप 5: आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.

स्टेप 6: त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.

स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.

अडीच लाख विद्यार्थी सहभागी होतील

जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतील. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महत्वाच्या तारखा

नोंदणी प्रक्रिया सुरु : 15 सप्टेंबर 2021 नोंदणीची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2021 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 परीक्षेची तारीख : 3 ऑक्टोबर 2021

दोन सत्रात परीक्षा

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर एक साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर दोन दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार जेईई अ‌ॅडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

इतर बातम्या:

Jee Main Result 2021: जेईई मेन्स परीक्षा निकालात 2 मुलींची बाजी, दिल्लीची काव्या चोप्रा, तेलंगाणाच्या कोमा शरण्याला पहिली रँक

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, नंबर 1 रँकवर 18 जण, महाराष्ट्राचा एकमेव अथर्व अभिजीत तांबट टॉपमध्ये

JEE Advanced 2021 Registration to be Started from today at jeeadv ac in check details here

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.