JEE Advanced 2022 Admit Card: जेईई ॲडव्हान्स्ड! 23 ऑगस्टला ॲडमिट कार्ड येणार, 11 सप्टेंबरला निकाल लागणार
जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असून, ते दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.
JEE Advanced 2022 Admit Card: JEE Advanced 2022 चे ॲडमिट कार्ड (Admit Card) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Mumbai) तर्फे मंगळवार,ऑगस्ट 23, 2022 रोजी जारी करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर (JEE Advanced Official Website) जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड 2022 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
महत्वाच्या तारखा
- जेईई ॲडव्हान्स्ड ॲडमिट कार्ड रिलीज होण्याची तारीख – 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2022
- जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा तारीख – 28 ऑगस्ट 2022
- जेईई ॲडव्हान्स्डच्या तात्पुरत्या प्रोव्हिजनल आन्सर की तारीख – 3 सप्टेंबर 2022
- जेईई ॲडव्हान्स प्रोव्हिजनल आन्सर की ची ऑनलाइन घोषणा – 11 सप्टेंबर 2022
- जेईई ॲडव्हान्स्ड निकाल जाहीर होण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2022
शिफ्टमध्ये घेण्यात येणार पेपर
जेईई ॲडव्हान्स्डमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असून, ते दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे. जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयांमधून प्रश्न विचारले जाणार आहेत.
जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा
कम्प्युटर बेस्ड टेस्ट मोडमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असतील. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या भाषेत परीक्षा देण्याचा पर्याय असेल.
ॲडमिट कार्ड डाउनलोड कसे करावे
- विद्यार्थी प्रथम या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in जा
- यानंतर ‘जेईई ॲडव्हान्स्ड 2022ॲडमिट कार्ड’ या लिंकवर क्लिक करा.
- आता येथे मागितलेले तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुमचं ॲडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही ते डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट घेऊन सोबत ठेवली पाहिजे.