JEE Advanced Topper Interview: यश कसे मिळवावे, जेईईमध्ये देशात टॉपर आलेल्या वेद लाहोटी याने दिल्या टिप्स

JEE Advanced Topper ved lahoti: इंदूर येथील वेद लाहोटी याने दहावीत 98.6 टक्के आणि बारावीत 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. जेईई-मेन 2024 मध्ये, त्याने 300 पैकी 295 गुणांसह अखिल भारतीय रँक 119 मिळवला. वेद लाहोटी याचा आवडता विषय गणित आहे.

JEE Advanced Topper Interview: यश कसे मिळवावे, जेईईमध्ये देशात टॉपर आलेल्या वेद लाहोटी याने दिल्या टिप्स
ved lahoti
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 7:06 AM

IIT मद्रासने JEE Advance चा निकाल जाहीर केला आहे. जेईई एडवांस्डमध्ये पेपर 1 आणि 2 या दोन्ही परीक्षेत एकूण 48,248 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 180,200 विद्यार्थी बसले होते. यंदा सुमारे आठ हजार मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत इंदूर येथील वेद लाहोटी याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने 360 पैकी 355 गुण मिळाले. आतापर्यंतच्या सर्वाधिक अंकाचा हा विक्रम आहे. निकाल या jeeadv.ac.in वेबसाईटवर पाहता येणार आहे. यशाचा फार्मूला सांगताना वेद म्हणतो, मी ठरवलेला अभ्यास पूर्ण करायचो. त्याशिवाय त्या दिवशी झोपायचो नाही. अभ्यास किती तास करावा, असे काही माझे धोरण नव्हते.

दहावी, बारावीत उत्तम गुण

इंदूर येथील वेद लाहोटी याने दहावीत 98.6 टक्के आणि बारावीत 97.6 टक्के गुण मिळाले आहेत. जेईई-मेन 2024 मध्ये, त्याने 300 पैकी 295 गुणांसह अखिल भारतीय रँक 119 मिळवला. वेद लाहोटी याचा आवडता विषय गणित आहे. त्याला गणितातील प्रश्न सोडवणे आवडते. त्याने मुलाखतीत सांगितले की, अभ्यासाचे कोणतेही वेळापत्रक निश्चित केलेले नव्हते. तो 8 तासांच्या झोपेबाबत कधीही तडजोड करत नाही. त्याला बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची शौकीन आहे.

परिवार इंदूरमध्ये, आई, वडील प्रेरणास्थान

वेदसाठी त्याची आई जया लाहोटी, वडील योगेश लाहोटी आणि आजोबा आर. सी. सोमाणी हे खरे प्रेरणास्थान आहेत. तो इंदूरमधील असून त्याने परीक्षेची तयारी कोटामध्ये केली. वेदने सहाव्या वर्गात कोचिंग सुरु केली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोटा येथे येण्याचे ठरले. त्याला मुंबई आयआयटीमधून संगणक अभियंता व्हायचे आहे. त्याला क्रिकेट खेळणे आणि बुद्धीबळ खेळणे आवडते.

हे सुद्धा वाचा

वेद लाहोटी याने यापूर्वी अनेक ठिकाणी पोरितोषिके मिळवली आहेत. त्याने ऑल्मिपियाडमध्ये देशातील पाच टॉपमध्ये क्रमांक मिळवला आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.