JEE Advanced Admit Card 2021: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार, डाउनलोड कसे करावे ते जाणून घ्या !

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज जाहिर होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी, खरगपूर यांच्यातर्फे 15 सप्टेंबर रोजी म्हणजे आज हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशीलमध्ये भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल.

JEE Advanced Admit Card 2021: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार, डाउनलोड कसे करावे ते जाणून घ्या !
विद्यार्थी
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 12:22 PM

मुंबई : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज जाहिर होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयआयटी, खरगपूर यांच्यातर्फे 15 सप्टेंबर रोजी म्हणजे आज हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जाऊन जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 2021 साठी प्रवेशपत्र मिळणार आहेत. (JEE Advanced Admit Card 202, Admission tickets for JEE Advance Exam will be available today)

सर्वात महत्वाचे म्हणजे हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबर 2021 पर्यंतच मिळणार आहेत. प्रवेशपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशीलमध्ये भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल. JEE Advanced 2021 Admit Card विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्याशिवाय विद्यार्थाला परीक्षेला देखील बसता येणार नाही.

प्रवेशपत्रावरच विद्यार्थ्याचे केंद्र, नंबर आणि अधिकची माहीती असणार आहे. त्यामुळेच JEE Advanced 2021 Admit Card अत्यंत महत्वाचे आहे. या JEE Advanced 2021 Admit Card वर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहीती असणार आहे. त्यामध्ये पालकाचे नाव, विद्यार्थीचे संपूर्ण नाव जेईई मेनचा रोल नंबर, अ‍ॅडव्हान्सचा रोल नंबर, सेंटर कोड, फोटो, वेळ, तारीख, पत्ता असेल.

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड करायचं?

स्टेप1: सर्वात अगोदर या jeeadv.ac.in वेबसाइटवर जा.

स्टेप2: त्यानंतर JEE Advanced 2021 Admit Card वर जाऊन नोंदणी क्रमांक आणि आपली जन्मतारीख टाका.

स्टेप3: त्यानंतर तिथे लॉगिन करा.

स्टेप4: पुढे तिथे तुम्हाला जेईई अॅडवान्स प्रवेशपत्र दिसेल.

स्टेप5: अगोदर त्या प्रवेशपत्रावरील सर्व माहीती चेक करा.

स्टेप6: त्यानंतर हे प्रवेशपत्र डाउनलोड करा.

संबंधित बातम्या : 

JEE MAIN 2021| जेईई मेन एप्रिल मे सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नेमकी कशी? वाचा सविस्तर

(JEE Advanced Admit Card 202, Admission tickets for JEE Advance Exam will be available today)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.