मुंबई: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने जेईई ॲडव्हान्स्ड 2023 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचा निकाल पाहण्यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट – jeeadv.ac.in जाऊन iitg.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळेल.
यंदा JEE Advanced Result 2023 दोन्ही पेपरमध्ये 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.
जेईई ॲडव्हान्स्ड 2023 मध्ये हैदराबाद झोनच्या Vavilala Chidvilas Reddy ने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 360 पैकी 341 गुण मिळाले. जेईई ॲडव्हान्स्ड 2023 परीक्षेतील टॉपर मुलगी देखील हैदराबाद झोनची आहे. 360 पैकी 298 गुण मिळवणारी नयकांती नागा भाव्या श्री ही महिला यंदा टॉपर ठरली आहे.