Success Story : JEE Advance मध्ये राज्यात पहिला आलेला मुंबईतील युवराजचा काय सक्सेस मंत्र

JEE Advanced Result 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या मुंबईतील युवराज अन् हैदराबादमधील रेड्डी यांनी कशी केली होती तयारी...

Success Story : JEE Advance मध्ये राज्यात पहिला आलेला मुंबईतील युवराजचा काय सक्सेस मंत्र
JEE Advanced yuvraj gupta
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:31 AM

मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी IIT JEE Advanced 2023 प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. JEE Advanced 2023 च्या प्रवेश परीक्षेत, हैदराबाद झोनच्या वी चिदविलास रेड्डी याने 360 पैकी 341 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. या परीक्षेत राज्यातून मुंबईचा युवराज गुप्ता पहिला आला. त्याला देशात १३ वा क्रमांक मिळाला. आता युवराज मुंबई आयआयटीमधून संगणक अभियंता होणार आहे. आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल तो आनंदी आहे.

जेईईच्या दोन्ही पेपरमध्ये देशभरातून 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.

कशी करावी लागते मेहनत

नारायण ग्रुप ऑफ स्कूलचा विद्यार्थी असलेला युवराज गुप्ता याने परीक्षेच्या तयारी विषयी आपले अनुभव शेअर केले. तो म्हणाला की, JEE Advanced ची तयारी करताना खूप मेहनत करावी लागते. दररोज 12-14 तास अभ्यास करावा लागतो. शिक्षक अन् सिनिअर्सचे मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला कन्सेप्ट समजून घेतले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

देशात पहिला आलेला रेड्डी म्हणतो…

JEE Advanced 2023 च्या प्रवेश परीक्षेत देशात वी चिदविलास रेड्डी पहिला आला. त्यालाही आयआयटी मुंबईमधून संगणक अभियंताची पदवी घ्यायची आहे. यानंतर त्याला संशोधन करायचे आहे. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने क्रिकेट खेळणेही सोडून दिले होते आणि गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब होता. जेईईच्या सहा महिने आधी मी रोज आठ ते दहा तास अभ्यास करत होता. अन् गेल्या दोन महिन्यांत दररोज 11-12 तास अभ्यास केला.

हे ही वाचा

NEET Success Story : शेतात काम केले, कोणताही क्लास लावला नाही अन् मिळवले नीटमध्ये यश

JEE Advanced Result चा निकाल आला, जाणून घ्या देशातील टॉप कॉलेज

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.