JEE Main Answer Key 2022 Session 2 Out: जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की जाहीर! बघा किती मार्क्स मिळतायत

JEE Main Answer Key 2022 Session 2: त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात.

JEE Main Answer Key 2022 Session 2 Out: जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की जाहीर! बघा किती मार्क्स मिळतायत
JEEImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:02 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की (JEE Main Session 2 Answer Key) जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Birth Date) टाकावी लागणार आहे. त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात.

5 ऑगस्टपर्यंत आक्षेप नोंदविता येतील

अर्जदार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आन्सर की विरूद्ध आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति चॅलेंज 200 रुपये शुल्क भरावे लागेल. जेईई मेन्स परीक्षेसाठी 6.29 लाख उमेदवार बसले होते. कम्प्युटरवर आधारित ही परीक्षा 25 ते 30 जुलै दरम्यान देश-विदेशात घेण्यात आली. आन्सर की जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या आव्हानाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतर अंतिम आन्सर की जाहीर होईल. 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या निकालाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. जेईई मेन्स परीक्षा यावेळी दोनदा घेण्यात आली. दोन्ही सत्रांची परीक्षा संपली आहे. आता उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

जेईई मेन्स सत्र 2 उत्तर की कशी डाउनलोड करावी

  • उमेदवार jeemain.nta.nic.in एनटीएच्या वेबसाइटला भेट द्या
  • त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या आन्सर की लिंकवर क्लिक करा
  • आता विनंती केलेली माहिती जसे की जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आन्सर की दिसेल.
  • उमेदवार आता उत्तर की डाउनलोड करू शकतात.
  • एनटीए हेल्पलाइन नंबर- जेईई मेन्स परीक्षा देणारे उमेदवार उत्तर कीमध्ये काही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हेल्पलाईन क्रमांक – ०११-४०७५९०००० किंवा ई-मेलवर jeemain@nta.ac.in करता येईल.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.