JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं….

केंद्रीय शिक्षण मंत्रालय ऑगस्टमध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटचे उर्वरित दोन टप्पे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Jee Main Neet Exam 2021 Decision ministry of Education)

JEE Main आणि NEET परीक्षेविषयी लवकरच मोठा निर्णय, शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं....
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 9:03 AM

मुंबई : केंद्रीय शिक्षण मंत्रालय ऑगस्टमध्ये अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन (Jee Main) आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटचे (Neet Exam 2021) उर्वरित दोन टप्पे घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. “एकंदर सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. जेणेकरून प्रलंबित दोन टप्प्यातील जेईई मेन्सचे वेळापत्रक आणि 1ऑगस्टला नीट-यूजी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत निर्णय घेता येईल”, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. (Jee Main Neet Exam 2021 Decision ministry of Education)

सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून जेईई मुख्य प्रवेश परीक्षा वर्षात चार टप्प्यात घेण्यात येते जेणेकरून विद्यार्थ्यांना आराम मिळेल आणि त्यांना गुण सुधारण्याची किंवा जास्त मिळवण्याची संधी मिळू शकेल. त्याअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात पहिला टप्पा आयोजित करण्यात आला असून मार्चमध्ये दुसर्‍या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते. तिसरा टप्पा एप्रिलमध्ये आणि चौथ्या टप्प्यात मेमध्ये होणार होता. परंतु कोरोना व्हायरसच्या घातलेल्या धुमाकुळामुळे प्रवेश परीक्षेचे तिसरा आणि चौथा टप्पा तहकूब करण्यात आला.

याशिवाय जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. ही परीक्षा 3 जुलै रोजी होणार होते. नीट-यूजीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

नीट परीक्षेसाठी कोण अप्लाय करु शकतं?

-अर्जदार हा मान्यताप्राप्त मंडळाचा 12 वी उत्तीर्ण असावा.

-बारावीमध्ये अर्जदाराचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान विषय असावेत.

-12 वी मध्ये उमेदवाराचे 50% पेक्षा जास्त गुण असावेत. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 40 टक्के अधिक गुण असावेत.

NEET UG परीक्षा पॅटर्न?

नीट (Neet) परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. इंग्रजी, हिंदी, गुजराती, बंगाली, तामिळ, मराठी, ओडिया, तेलगू, उर्दू इत्यादी वेगवेगळ्या भाषांमध्ये हा पेपर घेतला जातो. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 3 तास मिळतात. ज्यामध्ये 180 प्रश्नांची उत्तरं सोडवायला दिली जातात. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांचा समावेश आहे.

या परीक्षेत नकारात्मक चिन्हांकन (निगेटीव्ह मार्किंग सिस्टम) आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण म्हणजेच प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जातो.

(Jee Main Neet Exam 2021 Decision ministry of Education)

हे ही वाचा :

इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचे नियम बदलले, उदय सामंत यांची माहिती

विद्यार्थ्यांना दिलासा, आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.