JEE Main Session 2 Results Today: जेईई मेन सेशन 2 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता!

JEE Main Session 2 Results Today: निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि मागितलेली माहिती टाकावी लागणार आहे. निकालासोबतच एनटीए जेईई मेन्स टॉपर्सची (JEE Mains Topper) यादीही जाहीर करण्यात येणार आहे.

JEE Main Session 2 Results Today: जेईई मेन सेशन 2 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता!
JEE mains session 2 resultsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 11:48 AM

जेईई मेन सेशन 2 (JEE Main Session 2) चा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. एनटीए आज म्हणजेच  7 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करू शकते. आज दुपारी 2 वाजता जेईई मेन्सचा निकाल जाहीर (JEE Mains Result Declared) होऊ शकतो. या परीक्षेला बसणारे उमेदवार jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि मागितलेली माहिती टाकावी लागणार आहे. निकालासोबतच एनटीए जेईई मेन्स टॉपर्सची (JEE Mains Topper) यादीही जाहीर करण्यात येणार आहे. एनटीएने जेईई मेन्स 2022 सत्र 2 परीक्षा 25,26,27,28, 29 आणि 30 जुलै रोजी आयोजित केली होती.

जेईई मेन्स सत्र 2 चा निकाल 2022 कसा तपासायचा?

  • उमेदवारांनी प्रथम jeemain.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • त्यानंतर, उमेदवाराने विनंती केलेला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख माहिती प्रविष्ट करावी.
  • आता तुमच्या स्क्रीनवर रिझल्ट दिसेल.
  • विद्यार्थी हवे असल्यास त्यांचे गुण पाहून निकाल डाउनलोड करू शकतात.
  • जेईई मेन्स आन्सर की आधीच जाहीर झाली आहे

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा

यापूर्वी एनटीएने jeemain.nta.nic.in 2022 उत्तर की जारी केली होती. अर्जदारांना 3 ते 5 ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या जेईई मेन्स उत्तर की विरूद्ध आव्हान दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. एनटीए 2022 च्या आधारे जेईई मेनचा निकाल जाहीर करेल. आयआयआयटी, आयआयआयटी आणि जीएफटीआयसह सहभागी संस्थांद्वारे दिल्या जाणाऱ्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीए दरवर्षी जेईई मेन परीक्षा घेते. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल, त्यानंतर समुपदेशनासाठी नोंदणी करता येईल.

जेईई ॲडव्हान्स्डसाठी 7 ऑगस्टपासून नोंदणी सुरू

संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड 2022 अर्ज प्रक्रिया आज, 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात- jeeadv.ac.in परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. आयआयटी जेईई ॲडव्हान्स्डनुसार, अर्ज प्रक्रिया आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि 11 ऑगस्ट रोजी (संध्याकाळी 5 वाजता) बंद केली जाईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.