राम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) शनिवारी रात्री पुन्हा चर्चेत आलं होतं. यावेळी आनंद पटवर्धन यांची राम के नाम (Ram Ke Naam) ही डॉक्युमेंटरी दाखवण्यावरुन वाद निर्माण झाला होता.

राम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली
jnu
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 6:46 AM

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) शनिवारी रात्री पुन्हा चर्चेत आलं होतं. यावेळी आनंद पटवर्धन यांची राम के नाम (Ram Ke Naam) ही डॉक्युमेंटरी दाखवण्यावरुन वाद निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनानं राम के नाम दाखवण्यास विरोध केला होता. जवाहलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी यूनियनची (JNUSU) अध्यक्ष आईषी घोष (Aishe Ghosh) हिनं जेएनयूएसयूच्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंटरी दाखवण्यापासून विद्यापीठ रोखू शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर जेएनयूएसयूच्या कार्यालयाबाहेर शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थित राम के नाम ही डॉक्युमेंटरी शांततेत कोणत्याही वादाशिवाय दाखवण्यात आली. आईषी घोष हिनं या संदर्भातील ट्विट केलं आहे.

विद्यापीठ प्रशासनाचा विरोध?

जेएनयूएसयूनं राम के नाम डॉक्युमेंटरी शनिवारी दाखवण्याचं जाहीर केल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. विद्यापीठ प्रशासनानं विद्यार्थी यूनियनला डॉक्यूमेंटरी दाखवू नये असं कळवलं होतं. विद्यापीठ प्रशासनानं अनधिकृत उपक्रमांमुळे सामाजिक धार्मिक बंधुभाव आणि शांतेतच्या वातावरणाला धक्का बसेल, असं म्हटलं होतं. मात्र, जेएनयूएसयूनं विद्यापीठ प्रशासनाचा विरोध धुडकावून लावत शनिवारी रात्री 9 वाजता राम के नाम डॉक्युमेंटरी दाखवली.

कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाची परवानगी नसल्याचा खुलासा

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रशासनानं राम के नाम प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची याला परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं होतं. विद्यापीठात डॉक्युमेंटरी दाखवणाऱ्यांवर कारवाई करु असंही सांगण्यात आलं होतं. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता राम के नाम डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. जेएनयूएसयूची अध्यक्ष आईषी घोष हिनं आम्ही यूनियनच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजप आरएसएसच्या इशाऱ्यावर डॉक्युमेंटरी दाखवण्यास विद्यापीठ प्रशासनानं विरोध केल्याचं म्हटलं.

राम के नाम मध्ये काय?

चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आनंद पटवर्धन यांनी राम के नाम या डॉक्युमेंटरीची निर्मिती केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये 1992 मधील विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर बांधण्यासाठी राबवण्यात आलेल्या  अभियानासंदर्भातील चित्रण करण्यात आलं होतं.

इतर बातम्या:

Omicron update : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

Nagpur पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना माहीत आहेत का? ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती

JNUSU holds Peaceful screening of Ram Ke Naam after JNU administration warning of cancellation programme

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.