JoSAA Counselling 2023: IIT,NIT मध्ये ॲडमिशन साठी आजपासून काउंसलिंग शुरू, असं करा रजिस्ट्रेशन
IIT NIT admission process: समुपदेशन केलं जाईल त्यानुसार विद्यार्थी फॉर्म भरतील ज्या फॉर्मला नोंदणी करणे कॉलेज चॉईस करणे असे ऑप्शन असतील. याचा निकाल 27 जूनला लागेल तेव्हा विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालंय ते समजेल. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून हे सगळं करण्यात आलंय त्यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी चुकवू नये. त्यासाठी नोंदणी कशी करावी ते बघा. त्याच शेड्युल सुद्धा वाचा.

मुंबई: IIT, NIT आणि इतर केंद्र-आधारित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन समुपदेशन प्रक्रिया आज, 2023 जून 19 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालीये. JoSAA Counselling तर्फे समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. JEE Advanced आणि Mains मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार josaa.nic.in जाऊन समुपदेशनासाठी फॉर्म भरू शकतात. IIT आणि NIT यासह केंद्रातील चांगल्या तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. JEE Main उत्तीर्ण उमेदवार केवळ NIT च्या जागांवर प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर JEE advanced उत्तीर्ण उमेदवार IIT आणि NIT या दोन्ही जागांसाठी नोंदणी करू शकतात.
नोंदणी, ऑप्शन फाइलिंग आणि चॉइस लॉकिंग, कागदपत्र पडताळणी, जागा वाटप आणि रिपोर्टिंग हे सर्व JoSAA Counselling 2023 प्रक्रियेचा भाग आहेत. मॉक सीट वाटपाचा निकाल 27 जून रोजी जाहीर होणार आहे. अंतिम जागा वाटपाचा निकाल 30 जून रोजी जाहीर होणार आहे.
समुपदेशन केलं जाईल त्यानुसार विद्यार्थी फॉर्म भरतील ज्या फॉर्मला नोंदणी करणे कॉलेज चॉईस करणे असे ऑप्शन असतील. याचा निकाल 27 जूनला लागेल तेव्हा विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालंय ते समजेल. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून हे सगळं करण्यात आलंय त्यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी चुकवू नये. त्यासाठी नोंदणी कशी करावी ते बघा. त्याच शेड्युल सुद्धा वाचा.
JoSAA Counselling 2023 साठी नोंदणी कशी करावी
- josaa.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन करण्यासाठी तपशील टाका, अर्ज फॉर्म पूर्ण करा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआऊट सोबत ठेवा.
JoSAA Counselling 2023 शेड्यूल
- रजिस्ट्रेशन/चॉइस फिलिंग – 19 जून 2023
- AAT पात्र उमेदवारांसाठी नोंदणी – 24 जून 2023
- JoSAA मॉक सीट अलॉटमेंट रिजल्ट – 27 जून 2023
- रजिस्ट्रेशन लास्ट डेट: 28 जून 2023
- पहिल्या फेरीचा अंतिम जागा वाटप निकाल – 1 जून 30
- ऑनलाइन रिपोर्टिंग – 30 जून 2023 ते 4 जुलै 2023
- राउंड 2 सीट अलॉटमेंट रजिस्ट्रेशन: 6 जुलै 2023
JoSAA Counselling 2023 अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रमांसाठी नोंदणी आणि निवड भरण्याची प्रक्रिया 28 जून रोजी संपणार आहे. जेओएसएए समुपदेशन 2023 एकूण 6 फेऱ्यांमध्ये आयोजित केले जाईल आणि नोंदणी, निवड भरणे, जागा वाटप आणि प्रवेश निश्चिती यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश आहे.