Korean Language: कोरियन लव्हर्स इकडे लक्ष द्या! MA इन कोरियन स्टडीज करणार का?
Korean Studies: ज्या विद्यार्थ्यांना या पीजी कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना नव्या सत्रापासून प्रवेश घेता येईल. मात्र, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देण्याची गरज आहे, म्हणजेच सध्या तरी याबाबत संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.
Korean Language: जामिया मिलिया इस्लामिया (Jamia Millia Islamia) या शैक्षणिक सत्रापासून कोरियन स्टडीजमध्ये नवीन मास्टर्स (Post Graduation) कार्यक्रम सुरू करीत आहे. हा एक रेग्युलर कार्यक्रम असून, यात वर्षाला 25 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे काल, बुधवारी एका परिपत्रकात म्हटलं गेलंय. गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता दिली होती. जामियाचे रजिस्ट्रार नाझीम जाफरी यांनी परिपत्रकात म्हटले आहे की, मजलिस-ए-तमिळी (Academic Council) ने 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीत एमए इन कोरियन स्टडीज हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
कोरियन अभ्यासासाठी असे असेल शुल्क
जाफरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम परराष्ट्र भाषा विभागांतर्गत घेण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठीच्या कार्यक्रमाचे शुल्क 10,500 रुपये आहे. ज्या विद्यार्थ्यांना या पीजी कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना नव्या सत्रापासून प्रवेश घेता येईल. मात्र, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देण्याची गरज आहे, म्हणजेच सध्या तरी याबाबत संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. पण जामियाने पीजी कोर्समध्ये नवीन कोरियन स्टडी आणला आहे.
सीयूईटी पीजी परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार
या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना परदेशी अभ्यासक्रमांचा लाभ मिळणार आहे. जामियातील पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणी संपली आहे. जामिया येथील सीयूईटी पीजी परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्यासाठी लवकरच ॲडमिट कार्ड जारी करण्यात येणार आहे. जामियातील यूजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीयूईटी परीक्षा सुरू झाली आहे. पण मोजक्याच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जामियाने सीयूईटीचा अवलंब केला आहे. उर्वरित अभ्यासक्रमासाठी जामिया प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. सीयूईटीमधून यूजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा सुरू आहे. त्याचबरोबर पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 1 सप्टेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. कोरियन अभ्यासातील प्रवेशासाठीच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती लवकरच दिली जाणार आहे.