‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांचा स्मृतिदिन, जहाल नेते म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका
लाला लजपत राय यांना इंग्रजांचा विरोध केला म्हणून म्यानमारच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथून ते अमेरिकेला गेले आणि भारतात परत आले. देशात परतल्यावर लाला लजपत राय महात्मा गांधी यांच्या असहकर चळवळीचा भाग बनले होते.
नवी दिल्ली: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नाव म्हणजे लाला लजपत राय होय. लाला लजपत रॉय यांचा आज स्मृतिदिन आहे. लाला लजपत राय यांना शेर ए पंजाब आणि पंजाब केसरी या नावानं ओळखलं जातं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहालवादी गटाची ओळख लाल-बाल-पाल अशी होती. त्यामध्ये लाला लजपत राय यांचा समावेश होता.
पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक
लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 ला झाला होता. लाला लजपत राय यांची ओळख वकील, आर्यसमाजी आणि कष्टकऱ्यांचं आंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणारे आणि पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक अशी ओळख आहे. हिंदी-उर्दू-पंजाबीला प्रोत्साहन देण्याचं काम देखील लाला लजपत राय यांनी केलं होतं.
सायमन कमिशनला विरोध
लाला लजपत राय यांना इंग्रजांचा विरोध केला म्हणून म्यानमारच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथून ते अमेरिकेला गेले आणि भारतात परत आले. देशात परतल्यावर लाला लजपत राय महात्मा गांधी यांच्या असहकर चळवळीचा भाग बनले होते. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं. भारतातील कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी सायमन कमिशन आलं होतं. मात्र, सायमन कमिशनमध्ये कोणताही भारतीय नसल्यानं विरोध सुरु झाला होता.
सायमन कमिशनला ठिकठिकाणी विरोध सुरु झाला होता. मुंबईत सायमन कमिशन पोहोचल्यावर सायमन गो बॅकचे नारे लावण्यात आले होते. तर. पंजाबमध्ये सायमन कमिशनच्या विरोधाचं नेतृत्त्व लाला लजपत राय यांनीकेलं होतं. कमिशनला लाहोरमध्ये पोहोचताच काळे झेंडे दाखवले गेले. साँडर्सनं विरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लाला लजपत राय 18 दिवस रुग्णालयात दाखल होते. अखेर 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचं निधन झालं. ‘मेरे शरीर पर पड़ी एक-एक लाठी ब्रिटिश सरकार के ताबूत में एक-एक कील का काम करेगी.’ लाला लजपत राय यांचे हे शब्द भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरले.
लाला लजपत राय यांच्या निधनानं भारतीयांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. या असंतोषातूनचं पुढं शहीद भगतसिंह आणि इतर सहकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्यावरील लाठीमाराचा बदला घेतला.
इतर बातम्या:
नाशिक जिल्ह्यात 397 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; निफाडमध्ये 84 तर सिन्नरमध्ये 45 जण बाधित
Lala lajpat rai death anniversary know details about him