CSIR UGC NET परीक्षेचा अर्ज लगेच भरा, शेवटची संधी हुकवू नका
CSIR UGC NET: तुम्हाला सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा द्यायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, ज्या तरुणांना सीएसआयआर यूजीसी नेट डिसेंबर 2024 साठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी प्रथम अर्ज भरावा. कारण, त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. ही परीक्षा 16 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
CSIR UGC NET: तुम्ही सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा देण्यास इच्छुक असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण, शेवटची तारीख जवळ आली असून लगेच अर्ज भरावा लागणार आहे. सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा 16 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
सीएसआयआर यूजीसी नेट डिसेंबर 2024 सत्रासाठी अर्ज करण्याची वेळ आता संपणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 डिसेंबर 2024 रोजी संपणार आहे. इच्छुक उमेदवारांनी csirnet.nta.ac.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तात्काळ अर्ज करावा आणि सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची ही महत्त्वाची संधी गमावू नये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख किती?
उमेदवार 30 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. फॉर्ममध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी 1 जानेवारी ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत दुरुस्ती विंडो उघडण्यात येणार आहे.
सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाईल. ही परीक्षा तीन तासांच्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील आणि ते हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.
कोणत्या विषयांचा समावेश?
सीएसआयआर नेट परीक्षा केवळ पाच विषयांमध्ये घेतली जाते
- रासायनिक विज्ञान
- पृथ्वी, वातावरणीय, महासागर आणि ग्रहविज्ञान
- जीवन विज्ञान
- गणितीय विज्ञान भौतिक
- विज्ञान
अर्ज शुल्क
- सामान्य प्रवर्गातील उमेदवार: 1150 रुपये
- ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवार: 600 रुपये
- एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार: 325 रुपये
शैक्षणिक पात्रता
बीई, बीटेक, बीफार्म, एमबीबीएस, एमएससी किंवा समकक्ष पदवी सह सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55 टक्के गुण आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्के गुण असावे.
वयोमर्यादा किती?
या पदांसाठी अर्जदारांची वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत असावी. मात्र, लेक्चरशिपसाठी (LS) वयोमर्यादा नाही.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम csirnet.nta.ac.in अधिकृत संकेतस्थळावर जा.
- होम पेजवर ‘सीएसआयआर नेट डिसेंबर 2024’ अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि अर्जात आवश्यक तपशील भरा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत प्रिंट करा.