UPSC 2021 Results: बाबा रे! अभ्यास केलाय की गंमत… टॉपर्सला किती मार्क्स मिळाले माहितेय का?

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 मे 2022 रोजी आयएएस टॉपर्सचे गुण जाहीर केले. ज्या उमेदवारांनी निकालाच्या यादीत स्थान मिळवले आहे ते सर्व उमेदवार आता त्यांचे गुण तपासू शकतात.

UPSC 2021 Results: बाबा रे! अभ्यास केलाय की गंमत... टॉपर्सला किती मार्क्स मिळाले माहितेय का?
टॉपर्सला किती मार्क्स मिळाले माहितेय का?Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 11:08 AM

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल (UPSC 2021 Final Results) 30 मे रोजी जाहीर करण्यात आला आणि इतर परीक्षांप्रमाणेच (Exams) या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारली! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक पटकावला (Shruti Sharma AIR 1) आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 मे 2022 रोजी आयएएस टॉपर्सचे गुण जाहीर केले. ज्या उमेदवारांनी निकालाच्या यादीत स्थान मिळवले आहे ते सर्व उमेदवार आता त्यांचे गुण तपासू शकतात. UPSC 2021 च्या अंतिम निकालात पहिल्या 3 उमेदवारांचे गुण बघुयात.

UPSC 2021: टॉप 3 उमेदवारांचे गुण

  1. AIR 1 ची मानकरी श्रुती शर्माने 2025 पैकी 1105 गुण मिळवले, ज्यामुळे ती 54.56% मिळाले आहेत.
  2. AIR 2 अंकिता अगरवाल, लेखी परीक्षेत – 871 ,मुलाखतीत- 179 गुण. 2025 पैकी 1050 गुण मिळाले, ज्यामुळे तिला 51.85% मिळाले आहेत.
  3. AIR 3 गामिनी सिंगला, लेखी परीक्षेत – 858,  मुलाखत- 187 गुण. तिला 2025 पैकी 1045 गुण मिळाले ज्यामुळे तिला 51.60% मिळाले आहेत.

UPSC 2021: टॉप-10 उमेदवारांचे गुण

यूपीएससीचे एकूण गुण कसे तपासणार

  • स्टेप 1: परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांनी यूपीएससीचे गुण तपासण्यासाठी upsc.gov.in जावे
  • स्टेप 2: होमपेजवर, त्यांनी “निवड झालेल्या उमेदवारांचे गुण” त्यावर क्लिक करावे
  • स्टेप 3: निकाल पीडीएफ स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • स्टेप4: उमेदवारांनी त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करावे
  • स्टेप 5: उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट घेऊ शकतात

मागील वर्षाच्या टॉपर्सचे गुण

  1. 2020 मध्ये, एआयआर -1 धारक शुभम कुमार 52.04% गुण
  2. 2019 चा टॉपर प्रदीप सिंगने लेखी परीक्षेत 914 आणि व्यक्तिमत्त्व चाचणीवर 158 असे एकूण 1072 गुण मिळवले होते.
  3. 2018 मध्ये, कनिषक कटारियाने यूपीएससी सीएसईमध्ये 1121 गुण मिळवले – लेखी परीक्षेत 942 आणि व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये 179 गुण मिळवले.
  4. 2017 दुर्सिहट्टी अनुदीप, लेखी परीक्षेत 950, तर मुलाखतीच्या फेरीत 176 असे 1126 गुण मिळवणाऱ्या टॉपर दुर्सिहट्टी अनुदीपने गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गुण मिळवले होते.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.