Maha TET: अखेर महा टीईटी परीक्षा झाली, आता उत्तरतालिकेकडे विद्यार्थ्यांचं लक्ष

राज्यभरात टीईटी परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टीईटी परीक्षेची उत्तर तालिका लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

Maha TET: अखेर महा टीईटी परीक्षा झाली, आता उत्तरतालिकेकडे विद्यार्थ्यांचं लक्ष
महा टीईटी
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 12:17 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील 1443 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राज्यभरात टीईटी परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टीईटी परीक्षेची उत्तर तालिका लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. महा टीईटी परीक्षेची उत्तरतालिका mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

दोन सत्रात परीक्षा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तर तालिका येत्या काही दिवसात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. महा टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 ची परीक्षा रविवारी सकाळी 10:30 ते 1 आणि दुपारी 2 ते 4:30 या दोन सत्रामध्ये घेण्यात आली होती. महाटीईटी परीक्षेला राज्यभरातून तब्बल 3.43 लाख उमेदवार परीक्षेला उपस्थित असल्याची माहिती आहे.

उत्तर तालिका जाहीर झाल्यानंतर आक्षेप घेण्याची संधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तर तालिका जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे आक्षेप घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. विद्यार्थ्यांनी उत्तर तालिकेवरील आक्षेप नोंदवल्यानंतर परीक्षा परिषद अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर केला जाईल. महाटीईटी परीक्षेची उत्तर तालिका 1 डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षा पात्रता निकष?

टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.

एसटी संपामुळं विद्यार्थ्यांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज TET देणाऱ्या उमेदवांराचे हाल झाले. एसटी सेवा ठप्प असल्याने या परीक्षार्थींना जादा पैसे देऊन परीक्षा केंद्रावर प्रवास करावा लागला होता. तर TET आणि नेट ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी नाराजी व्यक्त केली होती.

इतर बातम्या:

टीईटी परीक्षेदरम्यान ब्ल्यूटुथ वापरल्याचा आरोप, गोंदियात विद्यार्थिनीविरोधात परीक्षार्थी आक्रमक

वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ, धुळ्यात खासदारांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना प्रवेश

MAHA TET Exam 2021MSEC will declare tet exam provisional answer key at Mahatet in

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.