साडे सहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के, इतक्या लाख विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला

यंदाच्यावर्षी 23 हजार 13 शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 6844 शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हणजे त्या शाळेतील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. त्याचबरोबर निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के पास झाल्या आहेत.

साडे सहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के, इतक्या लाख विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास मिळाला
Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.inImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 1:53 PM

मुंबई : आज सकाळपासून सगळे दहावीच्या बोर्ड (10th Result 2023) निकालाची वाट पाहत होते. शिक्षण विभागाकडून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर (Maharashtra Board 10th Result 2023 Live at mahresult.nic.in) करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्रातून दहावीच्या परिक्षेला 15,29,096 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14,34,893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी कोकण विभागाने (kokan division) बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. एकूण 10 हजार शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, म्हणजेचं त्या शाळांमधील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही.

इतक्या हजार शाळांचा निकाल शंभर टक्के

यंदाच्यावर्षी 23 हजार 13 शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 6844 शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. म्हणजे त्या शाळेतील एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. त्याचबरोबर निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के पास झाल्या आहेत. तर एकूण 23013 शाळांपैकी 6844 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची कामिगीरी सरस ठरली आहे. मुलींचा निकाल 95.87 टक्के तर मुलांचा निकाल 92.05 टक्के लागला. 92.05 टक्के मुलं पास झाली आहेत.

फर्स्ट क्लास आणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या…

जाहीर झालेल्या निकालामध्ये 4,89,455 विद्यार्थ्यांना 75 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. 526210 विद्यार्थी फर्स्ट क्लासममध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 334015 इतक्या विद्यार्थ्यांना सेंकड क्लास मिळाला आहे. 85298 इतक्या विद्यार्थ्यांना थर्ड क्लास मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

आजच्या दहावीच्या निकालातील ठळक मुद्दे

एकूण विद्यार्थी : 15,29,096

उत्तीर्ण : 14,34,893

कोकण विभाग (98.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण)

नागपूर विभाग (92.5 टक्के उत्तीर्ण)

मुंबई विभागाचा निकाल : 93.66 टक्के

100 टक्के निकाल शाळा: 10,000

दहावीचा विभाग निहाय निकाल

पुणे : 95.64 नागपूर : 92.05 औरंगाबाद : 93.23 मुंबई : 93.66 कोल्हापूर : 96.73 अमरावती : 93.22 नाशिक : 92.67 लातूर : 92.67 कोकण : 98.11

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.