फक्त एक सेकंदाचं काम अन् इयत्ता दहावीचा निकाल तुमच्या हाती; काय आहे फंडा?
Maharashtra Board 10th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता या परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची वाट पाहताना दिसले. आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून उद्या दहावीचा निकाल जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची वाट पाहताना दिसले. शेवटी बोर्डाकडून निकालाची तारीख ही जाहीर करण्यात आली. दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी लागणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यानंतर विभागीय टक्केवारी बोर्डाकडून जाहीर केली जाईल. दुपारी एक वाजता विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल हा पाहू शकणार आहेत.
दहावीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडल्या. 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर होईल. आता उद्या दहावीचा निकाल जाहीर होतोय.
27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल मिळणार आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी 5 ट्रिक्स फॉलो कराव्यात, त्यानंतर थेट निकाल विद्यार्थ्यांच्या हाती पडेल. यासाठी mahresult.nic.in/ mahahsscboard.in या साईटवर आपल्याला सर्वात अगोदर जावे लागेल.
‘या’ लिंकवर जाऊन पाहा दहावीचा निकाल, लिंक अॅक्टिव..
Maharashtra SSC RESULT
त्यानंतर विद्यार्थ्यांनी होम पेजवर जाऊन SSC Examination Result 2024 वर क्लिक करावे. त्यानंतर तिथे विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर थेट तुमचा दहावीचा निकाल तुमच्या स्क्रिनवर असेल. निकाल पाहण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. यासोबत बोर्डाकडून इतरही काही साईट निकाल पाहण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी दहावीचा निकाल https://www.tv9marathi.com/ या साईटवर जाऊन देखील पाहू शकतात. https://www.tv9marathi.com/ वर अगदी दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा दहावीचा निकाल पाहू शकता. आता या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. बारावीच्या निकाल मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या.