दहावीच्या निकालासाठी टीव्ही9 मराठी ऑफिशियल वेबसाईट; बोर्डाच्या परिपत्रकात काय म्हटलंय?
Maharashtra Board 10th Result : दहावीच्या निकालाची विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत होते. शेवटी आता दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले. आता दहावीचा निकाल 27 मेला ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपलीये.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आला. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची वाट पाहताना दिसले. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून आज 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल विद्यार्थी पाहू शकतील. प्रत्यक्षात मार्कशीट विद्यार्थ्यांच्या हाती कधी पडणार याबद्दल आज खुलासा केला जाईल.
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलंय. या परिपत्रकात निकालाबद्दलची माहिती देण्यात आलीये. टीव्ही9 मराठी ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही दहावीचा निकाल पाहू शकता. बोर्डाने परिपत्रकात टीव्ही9 मराठी ऑफिशियल वेबसाईटचा देखील निकाल पाहण्यासाठी उल्लेख केला आहे.
Maharashtra SSC RESULT
16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिलीये. राज्यात यंदा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान दहावीची परीक्षा पार पडलीये. https://www.tv9marathi.com/ या साईटवर जाऊन विद्यार्थी हे दहावीचा निकाल आरामात पाहू शकतात. अगदी झटपट पद्धतीने विद्यार्थ्यांना आपला निकाल हा पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे निकाल जाहीर करण्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतील.
या पत्रकार परिषदेमध्ये शरद गोसावी हे विभागीय निकाल जाहीर करतील. या निकालाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्याचे बघायला मिळतंय. यंदा देखील निकालात मुलीच वरचढ ठरतात की, मुले बाजी मारतात हे सोमवारी स्पष्ट होईल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. हेच नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीमध्येही वाढ झालीये.
दहावीच्या परीक्षा या कॉपीमुक्त पार पडल्या आहेत. बोर्डाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. 27 मेला जरी दहावीचा निकाल हा जाहीर केला जात असला तरीही विद्यार्थ्यांना मार्कशीटसाठी वाट पाहावी लागणार आहे. आता दहावीच्या निकालाबद्दलची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय.