Maharashtra Board 12th Result 2024 : ‘या’ वेबसाईटवर जाऊन पाहा बारावीचा निकाल, अत्यंत झटपट आणि..
Maharashtra Board HSC Result 2024 : उद्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा ही संपली आहे. उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. निकाल कधी लागणार याची सातत्याने विचारणा केली जात होती. अखेर आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा ही संपलीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीच्या निकाला जाहीर करण्यात आलाय. आज 21 मे 2024 रोजी बारावीचा निकाल लागला आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकणार आहेत. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद झालीये. यामध्ये नऊ विभागाची टक्केवारी जाहीर करण्यात आलीये.
राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही अत्यंत मोठा होता. ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर झालाय. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल आरामात पाहू शकतात.
Maharashtra HSC RESULT
mahresult.nic.in, results.gov.in., hscresult.mkcl.org, mahahsscboard.in आणि hsc.mahresults.org.in या साईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासोबतच तिथे जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर सबमिटचे बटन क्लिक केले की, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर असेल.
14 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचा निकाल लागल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची प्रतिक्षा होती. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढण्याची देखील शक्यता आहे. नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा ही पार पडलीये. या निकालात मुले बाजी मारतात की ,मुले हे आज समजेल.
गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली बाजी मारताना दिसतात. यंदा मुले वरचढ ठरतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे बारावीच्या निकालाची विभागीय टक्केवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जातंय.