इयत्ता बारावीत 100 पैकी 100 मार्क, संभाजीनगरच्या तनिषाने सांगितला फ्युचर प्लान; तुम्हीही घेऊ शकता आदर्श

नुकताच बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आलीये. विशेष म्हणजे या निकालात मुलींनी बाजी मारलीये. राज्यातूनही छत्रपती संभाजी नगरची मुलगी पहिली आलीये. हेच नाही तर तिला शंभरपैकी शंभर टक्के मिळाले आहेत. यंदा बारावीच्या निकालाच्या टक्क्यामध्ये मोठी वाढ झालीये.

इयत्ता बारावीत 100 पैकी 100 मार्क, संभाजीनगरच्या तनिषाने सांगितला फ्युचर प्लान; तुम्हीही घेऊ शकता आदर्श
Tanisha Sagar Boramanikar
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 4:16 PM

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आलीये. आज (21 मे 2024 ) रोजी बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान राज्यात परीक्षा पार पडल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाची वाट पाहताना दिसले. शेवटी आज बारावीचा निकाल लागलाय. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय.

विशेष म्हणजे यंदा बारावीच्या निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. सर्वच शाखेचे निकाल जबरदस्त लागले आहेत. बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. सर्वात कमी निकाल हा मुंबई बोर्डाचा लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. छत्रपती संभाजी नगरची विद्यार्थीनी राज्यात पहिली आली आहे.

विशेष म्हणजे या विद्यार्थीनीला शंभर टक्क्यांपैकी शंभर टक्के पडले आहेत. तनीषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती छत्रपची संभाजी नगरच्या देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तनीषा सागर बोरामणीकर ही राज्यातून पहिली आलीये. आता तनीषा बोरामणीकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

तनीषा सागर बोरामणीकर म्हणाली की, मला खूप छान वाटत आहे, मी फक्त 95 टक्के अपेक्षित धरले होते. मात्र मला 100 टक्के मार्क मिळाले आहेत. राज्यात प्रथम आले हे माझ्यासाठी खूप छान आहे. यामध्ये माझे आई वडील कुटुंब आणि शिक्षक यांचे श्रेय आहे. त्यांनीही माझ्यासाठी खूप मेहतन घेतल्याचे तनीषा सागर बोरामणीकर हिने म्हटले.

पुढे तनीषा बोरामणीकर म्हणाली, मला भविष्यात यूपीएससी क्रॅक करायची आहे. मी आता लगेच सीएची परीक्षा देणार आहे. यंदा छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल चांगलाच लागलाय. मुलांपेक्षा मुलींनी तब्बल 3.27 टक्के अधिक मिळवले आहेत. संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पडली. भरारी पथकांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाची वाट विद्यार्थ्यांकडून बघितले जातंय.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.